Ahilyanagar Political News : अहिल्यानगरमधील कोपरगावात भाजपची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 28 नगरसेवकांविरोधात ही याचिका भाजपकडून दाखल करण्यात आली होती.
56 अर्ज अवैध
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भारती सागरे (गायसमुद्रे) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांचेसह निवडणूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी कामकाज पहात आहे. या प्रक्रियेत अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबरला शेवटच्या दोन तासात 125 उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची प्राथमिक तपासणी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत चालली. निवडणुकीच्या नियमित कामकाज नुसार 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज छानणी आणि परस्पर विरोधी हरकती नोंदणी प्रक्रीया सुरु करण्यात आली. यात सर्वप्रथम नगराध्यक्षपदाचे उमेदवारांची छानणी आणि हरकती नोंदवण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर नगरसेवक पदाच्या 237 उमेदवारी अर्जामध्ये छानणी आणि मुदतीत हरकती प्रक्रियेत 56 अर्ज अवैध ठरविण्यात आले.
Kolhapur Crime : मोबाईल चोरीचा आळ जिव्हारी लागला, 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कोल्हापुरात सुपरवायझरवर गुन्हा
अर्ज बाद करण्याची मागणी
त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराग संधान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे आणि त्यांचे 28 नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राच्या नकलांचा आधार घेत नगराध्यक्ष आणि 28 नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रावरील एका कागदावर उमेदवारांची स्वाक्षरी नसल्याकडे लक्ष वेधत हे अर्ज बाद करण्याची मागणी करीत कोपरगावच्या सत्र न्यायालयात धाव घेतली.
सव्वा वर्षांचा चिमुकला पहिल्या मजल्यावरून कोसळला, पण नंतर चमत्कार झाला; कोल्हापुरातील VIDEO ने सर्वच आश्चर्यचिकत!
न्यायालयाने तक्रार फेटाळून लावली
न्यायायालयाने सर्व प्रतिवादी यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्याचे कळवले. यावर 22 व 23 नोव्हेंबरला सुनावणी झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजू मांडताना सांगितलं की, तक्रारदाराने निवडणूक प्रक्रियेत छानणी आणि हरकती नोंदविण्याच्या वेळी आमच्यासमोर लेखी अथवा तोंडी कुठलीही हरकत नोंदवली नाही. भारतीय लोकशाहीची मुल्ये जोपासतांना किरकोळ कारणावरुन उमेदवारांना अपात्र करुन लढण्यापासून वंचित ठेवणे गैर ठरेल, असं सांगितलं. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तक्रार फेटाळून लावली. तक्रारदारांच्यावतीने यांचे अॅड. जयंत जोशी तर प्रतिवादी वतीने अॅड. प्रशांत काटणेश्वरकर, गणेश गाडे, विधीज्ञ विद्यासागर शिंदे व सुयोग जगताप या वकिलांनी काम पाहिलं.
