स्थानक-आगारात स्वच्छता राखण्यासाठी योग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करून त्याची योग्य अंमलबजावणी करावी आणि भटक्या श्वानांचा वावर शोधून त्याचे निराकरण करण्यासाठी नियमित तपासणी करावी, असे आदेश मुख्य सचिवांनी एसटी महामंडळाला दिले आहेत.
स्थानक, आगार परिसरात अस्वच्छता आणि श्वानांना आकर्षित करणारे खाद्यपदार्थ टाकण्यात येतात. असे प्रकार थांबवून भटक्या आणि अनाथ श्वानांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महामंडळाला दिल्या आहेत. शिवाय स्थानक आणि आगारामध्ये भटक्या श्वानांचा अपघात झाल्यास आता आगारप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojna: मोठी अपडेट! eKYC ठरली गेमचेंजर, ‘या’ लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांना लागला कायमचा ब्रेक…
एसटी गाड्यांची स्थिती वाईट असून वेळापत्रकानुसार गाड्या धावत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड रोष आहे. अनेक स्थानक-आगारात मोफत पिण्याचे पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे यांची आबाळ आहे. अशात सर्वसामान्य प्रवास करत असताना भटके श्वान आणि अन्य जनावरांचा त्रासही एसटीच्या रोजच्या ५५ लाख प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मानव-श्वान संघर्षाच्या घटनांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यातील मुख्य सचिवांना याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महामंडळाने उपाययोजना करून त्याचा सविस्तर अहवाल २२ डिसेंबरपर्यंत सरकारला सादर करण्याची सूचना मुख्य सचिवांनी केली आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील स्थानक, आगारात श्वानांचा मुक्त वावर रोखण्यासाठी श्वानांना आकर्षित करणाऱ्या खाद्यपदार्थांची योग्य विल्हेवाट लावावी.
राज्याला कुपोषणाचा विळखा; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषित बालकं, काय सांगते आकडेवारी?
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
बस स्थानक आणि आंतरराज्य बस टर्मिनल परिसरात संबंधित नगरपालिका अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली भटक्या श्वानांना रोखण्यासाठी आवश्यक कुंपण आणि भिंती उभारून परिसर सुरक्षित करावा. बस टर्मिनल परिसरात स्वच्छता राखून श्वानांचा वावर रोखण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि या अधिकाऱ्यांची माहिती टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे लावण्याचे आदेशही मुख्य सचिवांनी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांना दिले आहेत.
