Pankaja Munde PA Wife Ends Life: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. त्यापूर्वी त्यांनी अखेरचा फोनकॉल हा अनंत यांना केला होता.
याप्रकरणी वरळी पोलिसांनी कारवाई करत पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि ननंद शीतल गर्जेविरोधात गुन्हा दाखल केला असून अनंत गर्जे यांना रात्री एक वाजता अटक करण्यात आली आहे.
Anant Garje Wife Death: गर्भपाताचे पेपर सापडले, नवऱ्याचं नाव अनंत गर्जे अन्… डॉक्टर गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणाबाबत दमानियांचा मोठा दावा
डॉक्टर गौरी यांच्या पालकांनी सासरच्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, गौरी ही स्वत:चा जीव घेऊ शकत नाही, तिची हत्या करण्यात आली आहे, असाही आरोप त्यांनी केला. मात्र, अनंत गर्जे यांनी या प्रकरणात वेगळाच दावा केला आहे. डॉक्टर गौरी यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्यापूर्वी मला फोन केला होता. मी जीव देत आहे, असं तिने सांगितलं होतं. पंकजा मुंडे यांच्यासोबत दौऱ्यावर असताना मला तिचा कॉल आला होता. मी तातडीने दौरी सोडून घरी परतलो, पण तोपर्यंत गौरीने गळफास घेतलेला होता.
Anant Garje: चॅटिंग पकडताच हातावर वार; मी मरेन, तुला गुंतवेन, अनंत गर्जेंनी दिलेली पत्नी गौरी यांना धमकी, नातेवाईकांचा दावा
घरी पोहोचलो, तेव्हा गौरीने दार उघडलं नाही. मी 31 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून 30 व्या मजल्यावरील आमच्या घराच्या खिडकीतून घरात शिरलो. तेव्हा मला ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर मी तिला तात्काळ नायर रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असा दावा अनंत यांनी केला.
गौरी पालवे यांच्या वडिलांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे गौरी आणि अनंतचे सतत वाद व्हायचे. सासरचे तिचा छळ करायचे, असाही दावा त्यांनी केला.
