Laundry man returns gold: जळगाव शहरात माणुसकीचे दर्शन घडले. साई श्रद्धा लॉन्ड्रीचे मालक योगेश निंबाळकर यांना एका ग्राहकाच्या कपड्यांमध्ये सोन्याची दोन पोत सापडली. अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या या पोत पाहूनही योगेश निंबाळकर यांनी लोभ केला नाही.
जळगाव शहरातील एका अपार्टमेंटमधील साई श्रद्धा लॉन्ड्रीचे मालक योगेश भागवत निंबाळकर यांचे छोटेसे दुकान आहे. या दुकानात त्याच अपार्टमेंटमधील भावसार म्हणून रहिवासी यांनी निंबाळकर यांच्याकडे प्रेससाठी कपड्यांची पिशवी आणून दिली. कपड्यांची पिशवी दुसऱ्या दिवशी लॉन्ड्री चालकाने प्रेस करण्यासाठी घेतली तर त्यात त्यांना पॅन्ट मध्ये खिसा फुगलेला दिसला. त्यांनी बाहेर काढून बघितले तर चक्क सोन्याच्या दोन पोत त्या पाकिटात आढळून आल्या होत्या.
Dhule News: सेल्फी घेताना तोल गेला, तरुण पुलावरुन तापी नदीत कोसळला; स्थानिकांची आरडाओरड, धुळ्यातील भयंकर घटना
सध्या सोन्याचे भाव देखील गगनाला भिडलेले आहेत साधारण अंदाजे बघितले तर त्या दोन सोन्याच्या पोत या जवळपास चार लाखापर्यंत असू शकतात. मात्र त्या किती तोळ्याचे आहे यादेखील निंबाळकर या लॉन्ड्री चालकाने त्या कुटुंबाला विचारणा केली नाही. आपले काम हे प्रामाणिकपणे त्याने केले. सोनं म्हटलं म्हणजे अनेकांच्या डोळे फिरू लागतात, मात्र या लॉन्ड्री चालकाला सोन्याकडे पाहून थोडाही लोभ आला नाही.
आमच्यावर घराणेशाहीचे आरोप, पण समोरच्यांचं काय? या निवडणुकीसाठी मी मैदानात : रक्षा खडसे
दुसऱ्याच दिवशी परत
दिनांक 21 नोव्हेंबर रोजी भावसार यांनी संध्याकाळी निंबाळकर यांच्याकडे कपड्यांची पिशवी प्रेस साठी आणून दिली ते पिशवी ठेवून घरी परत निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी निंबाळकर यांनी ती पिशवीतील कपडे प्रेस करण्यासाठी घेतले त्यांना पॅन्ट मध्ये पाकीट आढळले आणि त्या पाकिटामध्ये सोन्याची दोन पोती त्यांना दिसून आल्या. त्यांनी लागलीच लोभेचा विचार न करता प्रामाणिकपणे भावसर कु़टुंबाच्या घरी जाऊन त्या पोत परत केल्या. भावसार कुटुंबांनाही माहीत नव्हते की त्या पिशवीतील पॅन्ट मध्ये सोन्याची पोत आहे. योगेशला पाहताच त्यांना आश्चर्य झाले आणि परत केल्याबद्दल त्यांनी योगेशचे मनापासून आभार मानले.
