Nanded Crime News : नांदेडमध्ये साडेपाच हजार रुपयांच्या लाचेसाठी नायब तहसिलदारांनी लाज सोडलेली पाहायला मिळाली आहे. येथे लाच घेताना महिला नायब तहसिलदाराला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराचे हदगाव तालुक्यात रेशन दुकानं आहे. तक्रारदाराला मागील चार महिन्याचा धान्य पुरवठा झाला होता. त्यातून दुकानदाराला 5 हजार 700 रुपये कमिशन प्राप्त झाले होते. शिवाय नोव्हेंबर महिन्याचे ई-पॉज मशीनमध्ये धान्याचे अपलोड झाले नव्हते. रेशचे धान्य अपलोड करण्यासाठी आणि 27 नवीन लाभार्थ्यांचे नाव अपलोड करण्यासाठी तक्रारदाराने 18 नोव्हेंबर रोजी हदगाव तहसील कार्यलयात कार्यरत असलेल्या निरीक्षक अधिकारी तथा नायब तहसीलदार सुमन संभाजी कऱ्हाळे यांची भेट घेऊन इ-पॉज मशीनवर नोव्हेंबर महिन्याचे धान्य अपलोड करण्याची विनंती केली. यावेळी महिला अधिकाऱ्याने चार महिन्याचे रेशनचे 57 हजाराचे 20 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली.
Anant Garje Wife Death: पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीने जीव दिला, अनंत गर्जेंविरोधात पोलिसांची मोठी कारवाई
डाटा एन्ट्री ऑपरेटर पदावर असलेल्या गोविंद आप्पाराव जाधव यांना लाच देण्यास सांगितलं. तडजोडी अंती 10 टक्के म्हणजेच 5 हजार 700 रुपये देण्यास ठरलं. दरम्यान, रेशन दुकानदाराने तक्रार दिल्यानंतर लाच लुचपत विभागच्या पथकाने काल शनिवारी तहसील कार्यालयातच सापळा रचला. डाटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला स्वतःसाठी आणि नायब तहसीलदार यांच्यासाठी लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडलं. लाच लुचपत अधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारासह अन्य एकाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यावेळी दोन मोबाईल जप्त केले. नायब तहसीलदार कऱ्हाळे यांना अटक करण्यात आली असून डाटा एन्ट्री ऑपरेटर गोविंद जाधव याला वैद्यकीय कारणास्तव नोटीसवर सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे हदगावमध्ये खळबळ उडाली आहे.
