Vasai Teacher Arrest FIR : वसईतील हायस्कूलमध्ये 13 वर्षीय अंशिका गौडला शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे तिची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
शाळेमध्ये पोहचण्यासाठी 10 मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला. राग अनावर झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थीनीची तब्येतच बिघडली व तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं, पण दुर्देवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली.
Accident News : तीर्थयात्रेहून येताना काळाची झडप, रिक्षाने घरी परतताना ट्रॅव्हल्सचा पत्रा रिक्षावर कोसळला; दोन महिलांचा अंत
भीतीपोटी अंशिकाने उठाबशा घातल्या
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थीनीचं नाव अंशिका गौड आहे. ती फक्त 13 वर्षांची होती आणि सहावीत शिकत होती. 8 नोव्हेंबर रोजी अंशिका नेहमीप्रमाणे शाळेमध्ये पोहोचली. पण तिला 10 मिनिटं उशिर झाला होता. याच कारणाने शिक्षिकेने अंशिकासह इतर उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं व उठाबशांची शिक्षा सुनावली. घाबरुन गेलेल्या अंशिकानं सर्व 100 उठाबशा काढल्या. यातच तिची तब्येत बिघडली. दुसऱ्याच दिवशी तिला वसईमधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणाहून तिला मुंबईमध्ये हलवण्यात आलं कारण तिची तब्येत नाजूक झाली होती. पण शेवटी नको तेच घडलं आणि बालदिनालाच अंशिकाने प्राण सोडले.
मोठी बातमी! माळेगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, सुप्रिया सुळे संतापल्या
शाळेला मान्यताच नाही
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने शाळेविरोधात तीव्र भूमिका घेत शाळेला टाळं ठोकलं आहे. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही, असा इशाला मनसेने दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेला मान्यताच मिळालेली नाहीये. कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या या शाळेतील शिक्षिकेच्या भयंकर शिक्षेने एका निष्पाप मुलीचा जीव गेला.

