Angar Nagar Panchayat Election : सोलापुरातील अनगर नगरपंचायतीतील सर्व 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मात्र नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने या पदासाठी मात्र निवडणूक होणार आहे.
2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत.
महायुतीचंही बिनसलं, महाविकास आघाडीही नाही; ठाकरेंनाच जमलं! मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर लढणार निवडणूक
अनगर नगरपंचायतीचा निकाल
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचा आज सोमवारी सायंकाळी निकाल लागला आहे. अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे सर्व 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. भाजप नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वात हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. पण या मुदतीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
Pune Crime: पुण्यात सिंहगड कॉलेजजवळच 22 वर्षीय तरुणाची हत्या; दगडाने ठेचलं, कोयत्याने वार केले अन्…
अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक
अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पद देखील बिनविरोध करायचा असा मानस राजन पाटील यांचा होता. त्यांच्या धाकट्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांना बिनविरोध विजयी करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र, आता नगराध्यक्षपदासाठी भाजप व अजित पवार गटाच्या उमेदवारात लढत होणार आहे. भाजपने ही निवडणूकही बिनविरोध करण्यासाठी ताकद लावली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आज पहाटे 5च्या सुमारास नगरपंचायत गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

