• Tue. Sep 1st, 2026

Mumbai Ganeshotsav 2026: यंदा ‘संतुलना’चे मोल! मुंबईतील गणेशोत्सवात उंच मूर्तींऐवजी तोल सांभाळणाऱ्या, अधांतरी मूर्तींचे आकर्षण

Mumbai Ganeshotsav 2026: लालबाग, परळ परिसरात अनेक गणेश कार्यशाळा असून गेल्या दोन आठवड्यांपासून आगमन मिरवणुकांची रेलचेल सुरू आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
दिपेश मोरे,मुंबई : ‘चला हो राया जाऊ बघाया मुंबईचे गणपती रे’ हे प्रख्यात शाहीर व गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले गाणे आजही तितकेच गुणगुणले जाते. मुंबईच्या गणपतींचे आकर्षण आजही कायम असून राज्यातूनच नाही, तर देश-विदेशातून लाखो भाविक मुंबईत येतात. आजवर ‘उंची’ हे मुंबईच्या गणपतींचे खास आकर्षण राहिले आहे. यावर्षी मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू उंची नसून ‘तोल’ आहे. अनेक मंडळांनी अधांतरी, उत्तम संतुलन सांभाळत तयार केलेल्या, वेगवेगळ्या रूपातील मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

भव्य आणि कलात्मक गणेशमूर्ती, आकर्षक सजावट आणि उत्साहाने भारलेले वातावरण यामुळे मुंबईचा गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आकर्षणाचे केंद्र ठरतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत विदेशातून अनेक पर्यटक मुंबईला भेट देतात. गणेश मंडळांमधील मूर्तींच्या उंचीची स्पर्धा काही नवीन नाही. सर्वात जास्त उंच मूर्ती आमचीच म्हणत जाहिरातबाजी केली जाते. लालबाग, परळप्रमाणे खेतवाडी तसेच उपनगरांतील काही मूर्तीची उंची दरवर्षी भाविकांचे लक्ष वेधून घेते. यंदा मात्र उंचीऐवजी बाप्पाचा ‘तोल’ हा चर्चेचा विषय ठरत आहे. शंकर, श्रीकृष्ण, श्रीराम, नरसिंह अशा वेगवेगळ्या रूपांतील आणि विशेषतः कमीत कमी आधारावर असलेल्या मूर्ती लक्षवेधी ठरत आहेत.

Maharashtra TimesDevendra Fadnavis: साडेबारा हजार पदे भरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देशआगमन मिरवणुका पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळत असून छायाचित्रे, व्हिडीओच्या माध्यमातून गणेशाची ही वेगवेगळी रूपे कैद केली जात आहेत. रील्सच्या माध्यमातून या मूर्ती व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर मिळणारा भाविकांचा प्रतिसाद पाहता या मूर्ती, मूर्तीकाराची कलाकुसर प्रत्यक्षात पाहण्यासाठी अधिक गर्दी उसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अत्यल्प आधारावर असलेल्या मूर्तीचे वजन कमीत कमी असावे यासाठी कागदाचा लगदा तसेच इतर साहित्याचा वापर केला जात आहे. मूर्तीचा तोल जाऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचेही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अशी स्पर्धा नको
उंच आणि तरंगत्या मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्या तरी यावर्षी आगमन सोहळ्यांना भुलेश्वरचा राजाच्या दुर्घटनेची दुःखद किनार आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे करण्याच्या नादात नको ती स्पर्धा नको, मूर्तिकारांनी भाविकांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा विचार करावा, असा सूर सध्या सोशल मीडिया आणि जनमानसांत आहे.

Maharashtra TimesVoter List: महाराष्ट्रात तब्बल २ कोटी मतदार वगळले; नवी यादी जाहीर, तुमचं नाव नसेल तर काय करावं लागणार? जाणून घ्या प्रक्रियाकाही लक्षवेधी मूर्ती …
– तुळशीवाडीचा राजा परळचा
– महाराजा मुंबईचा पेशवा मुंबईचा
– इच्छापूर्ती कुलाब्याचा युवराज
– हुकमिल लेनचा राजा कोलभाट
– लेनचा राजा मोरया मौलाना आझाद
– नगरचा मुंबादेवीचा गणराज

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा