• Tue. Sep 1st, 2026

Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ; रीलस्टार संतोष पंडितांसह दोघांवर डेक्कन पोलिसांत गुन्हा

पुणे : भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि शिवराळ मजकूर असलेली व्हिडिओ क्लिप पोस्ट करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. मंत्र्यांची जाहीर बदनामी केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन संशयितांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात थेट तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रीलस्टार संतोष पंडित याच्यासह त्याच्या एका साथीदारावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपींनी सोशल मीडियावरील ‘राजकारण एक्सप्रेस’ नावाच्या अकाउंटवरून चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करणारी एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांना बगल देतात, अशा आशयाचा दावा करत या व्हिडिओमध्ये मंत्र्यांवर थेट टीका करण्यात आली होती. मात्र, केवळ टीका न करता त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ व असभ्य भाषेचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. बदनामीच्या हेतूनेच ही क्लिप तयार केल्याचे सांगत पांडे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. सार्वजनिक शांतता भंग करणे, बदनामी करणे आणि अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी नवीन फौजदारी कायद्यानुसार म्हणजेच ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम ३५६, २९६ आणि ३ (५) अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर राजकीय नेत्यांना अथवा लोकप्रतिनिधींबाबत पोस्ट केल्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. जाधव करत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed