म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: एल निनो आता अधिक सक्रिय झाला असून त्याचा फटका ऑगस्टमध्ये राज्य आणि देशालाही बसला. आजपासून सुरू होत असलेल्या सप्टेंबरमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज आहे. हवामान खात्याने सोमवारी ही माहिती दिली.
सप्टेंबरमध्ये देशात पावसाची दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिमी आहे. ऑगस्टप्रमाणे सप्टेंबरमध्येही पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे पावसाचा दिलासा मिळू शकेल. काही प्रमाणात मध्य प्रदेशात पाऊस पडू शकेल. मात्र, महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल. कमी दाबाच्या प्रणाली या महिन्यातही निर्माण होऊ शकतात. परंतु, या प्रणालीचा फायदा पूर्वेकडील राज्यांना मिळू शकतो. या प्रणाली पश्चिम दिशेकडे येण्याची शक्यता नसल्याने राज्याला फायदा होण्याची शक्यता आतातरी दिसत नसल्याचे हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले. या काळामध्ये राज्यातील कमाल तापमानही सरासरीपेक्षा चढे असेल.
ती आशा मावळली!
सप्टेंबर महिन्यामध्ये सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती निर्माण होऊन एल निनो सक्रिय असतानाही पाऊस अधिक पडू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, सध्या तरी आयोडी तटस्थ असून सकारात्मक दिशेने झुकलेला आहे. सप्टेंबरमध्ये या स्थितीचा पावसासाठी फायदा होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
पावसाची वाढती तूट
सप्टेंबर अखेरीस देशात पावसाची १३.८ टक्के तर राज्यात १२ टक्के तूट आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही तर ही तूट आणखी वाढू शकते. ऑगस्ट महिन्यात १६.३ टक्के तूट नोंदली गेली. त्यामुळे एकूण तूट १३.८ टक्के झाली आहे.
जुलैमध्ये विक्रम; ऑगस्टमध्ये पावसाची दडी!
पावसाने पुण्याला जुलैमध्ये अक्षरशः झोडपून काढले आणि १९०७ सालचा ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; मात्र त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. ऑगस्टमध्ये पुण्यात सरासरीच्या तुलनेत ४४.५ टक्के म्हणजेच केवळ ८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्ट हा गेल्या काही वर्षांतील सर्वांत कमी पाऊस पडलेला महिना ठरला.
‘एलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, राज्याच्या बहुतांश ठिकाणी सरासरीच्यापेक्षाही कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यंदा मे महिन्याच्या अखेरीस व्यक्त केला होता. त्यानुसार पुण्य़ाला जून महिन्यातच पावसाने ओढ दिली. जूनमध्ये केवळ ६४ मिमी पावसाची नोंद झाली. जुलैत पहिल्या दिवसापासून मान्सून सक्रिय झाला. हलका, मध्यम, जोरदार, संततधार सर्व प्रकारच्या पावसाची महिनाभरात नोंद झाली. या पावसाने ११९ वर्षांचा विक्रम मोडून सरासरीच्या दुप्पट कोसळला. जुलैमध्ये पुण्याच्या शिवाजीनगर येथे ५०८.९ मिमी पाऊस नोंदला गेला. २०२६ मधील जुलै हा पुण्याच्या नोंदवलेल्या इतिहासातील सर्वाधिक पावसाचा महिना ठरला. या पावसाचा सर्वाधिक फायदा पुण्याच्या धरणांना झाला. या पावसाने महिनाभरात झपाट्याने पाण्याची पातळी वाढली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा