Man drowns at Ganpatipule Beach: रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे-भिवंडी परिसरातील सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते.
सहा मित्र देवदर्शनासाठी पुळ्यात
ठाणे-भिवंडी परिसरातून एकूण सहाजण गणपतीपुळे येथील देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या ग्रुपने या परिसरात पर्यटनाचा आनंद घेत गणपतीचे दर्शनही घेतलं आनंदाने फोटोसेशनही केलं होतं त्यानंतर समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी यातील तीन ते चार जण समुद्रात गेले होते, त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
Raigad Crime : चल लग्न करू, मंदिरात खोटं खोटं लग्न केल्यावर लगेच शरीर संबंधही ठेवले, शेवटी… रायगडमधील धक्कादायक घटना
पोहायला गेले अन्
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण समुद्रात उतरले होते. यामध्ये हे तिघेही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याची घटना घडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून मोरया वॉटर स्पोर्ट यांच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तात्काळ धाव घेत तिघांना पाण्याबाहेर काढले. यातील अमोल गोविंद ठाकरे (25, रा. भिवंडी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विकास विजय पालशर्मा (24) आणि मंदार दीपक पाटील (24, दोघेही रा. भिवंडी) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक व जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून त्या तरूणांना वाचवले. तातडीने तिघांनाही गणपतीपुळे देवस्थानच्या अॅम्बुलन्सने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अमोल ठाकरे याला मृत घोषित केले. सध्या पर्यटकांची मोठी गर्दी समुद्रकिनारी आहे. घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे, आमचाच महापौर होणार : बाळासाहेब थोरात
मृत्यू झालेला अमोल गोविंद ठाकरे हा भिवंडी परिसर येथे खाजगी नोकरी करत होता. त्याच्या दुर्देवी मृत्यूने मित्रपरिवार व ठाकरे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यासाठी आहे.

