Dr. Yogesh Khirsagar Resigns NCP: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी वाढली असून, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुकवर हा राजीनामा प्रसिद्ध केला असून फेसबुक अकाऊंटवर आता फक्त काकू , जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे फोटो ठेवले असल्याचे पहावयास मिळत आहे.
Nashik News: मुंबईतल्या जागावाटपावरुन महायुतीत मिठाचा खडा, मंत्री संजय शिरसाट भाजप नेत्यांवर भडकले
पुढील राजकीय भूमिकेबद्दल उत्सुकता
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बीड जिल्ह्यात सध्या मोठ्याप्रमाणावर गटबाजी सुरु झाली आहे. अगोदर आ. धनंजय मुंडे यांना पक्षातीलच काही लोकप्रतिनिधींनी टीकेचे लक्ष केले होते, त्यानंतर आता बीड मतदारसंघात आपल्याला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवले जात असल्याचे सांगत पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्षाकडून बीड विधानसभेची निवडणूक लढविली होती, त्यात त्यांना सुमारे ९३ हजाराहून अधिक मते मिळाली आणि त्यांचा निसटता पराभव झाला होता.
त्यानंतर नगरपालिका निवडणुकीची सारी सूत्रे आपल्याकडे राहावीत अशी अपेक्षा डॉ. योगेश क्षीरसागर यांची होती. मात्र यात निर्णयप्रक्रियेतूनच आपल्याला डावलले जात असल्याचे सांगत आता डॉ. क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कालपासूनच डॉ. योगेश क्षीरसागर याना वगळून नगरपालिका निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती ‘शिवछत्र ‘वरून पंडितांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काही काळ अगोदर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र सावध भूमिका घेत स्वतःला अलिप्त ठेवले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील डॉ. योगेश क्षीरसागर यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला, त्यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली होती. आता बीड विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी झालेली जवळीकता मात्र अल्पकाळातच तुटल्याचे चित्र पाहावयास मिळतं आहे. मात्र आगामी काळात डॉ योगेश क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे मंत्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

