Devendra Fadanvis on sharad pawar: बिहार निवडणुकीतील एनडीएच्या विजयानंतर विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, लोकांना आवडतील अशा योजना राबवण्याची संधी पूर्वीच्या सरकारलाही होती. “त्यांचीदेखील सत्ता होती. त्यांनी लोकांसाठी त्या योजना राबवल्या नाहीत. आम्ही योजना राबवल्या आणि लोकांना त्या आवडल्या. लोकांनी आम्हाला मत देऊन विजय दिला. यात लोकांना दोष देण्याचं कारणच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ना ‘एसआयआर’ ना आणखी काही, ‘या’ एका कारणाने NDA ला मिळाला मोठा विजय, शरद पवारांनी बिहार निवडणूक निकालाचं केलं विश्लेषण
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही निवडणूक निष्पक्ष नसल्याचे वक्तव्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी जेव्हा पर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तेव्हा पर्यंत प्रत्येक निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट चर्चेत होती. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. बिबट्यांच्या वाढत्या दहशतीसंदर्भातही लवकरच महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे.” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्ष एकत्र की स्वतंत्र लढत आहेत. यापेक्षा मुंबईच्या जनतेचे महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे, विरोधी पक्ष कसा लढतो, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्या ठिकाणी महायुतीच्या विजय होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

