Pune Accident News : पुण्याच्या नवले ब्रिजवर अपघाताची मालिका सूरूच असते.आता पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. या घटनेत नवले पुलावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन कंटेनर आणि कारची धडक झाली होती. पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला होता.
प्रत्य्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात असताना पुढील कंटेनरनं अचानक ब्रेक लावला. मागून येणाऱ्या कारचालकाला वाहन नियंत्रणात आणता न आल्यानं ती कार थेट पुढील कंटेनरला जाऊन धडकली. त्यानंतर मागील कंटेनरही कारवर आदळला. या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Kalyan News : हृदयद्रावक! शाळकरी विद्यार्थिनीचा 19व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, आई-वडिलांचा आक्रोश
घटनेनंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून. अग्निशमकचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झालं होतं. घटनास्थळावर धूर आणि आगीचे लोट पसरले होते. नवले पुल परिसरात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
वाढवण नजीक समुद्रात पहाटे टगबोट बुडाली, तटरक्षक दलाच्या तातडीच्या मदतीमुळे वाचले पाच जणांचे प्राण, पण….
नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. यामध्ये अनेकजण जखमी आहेत. सध्या पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवला आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे.

