• Thu. Mar 12th, 2026

    Pune : ‘त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा’, मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या आरोपांच्या प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश

    Pune : ‘त्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा’, मुलींना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या आरोपांच्या प्रकरणात कोर्टाचा मोठा आदेश

    कोथरूडमधील मुलींवरील मारहाण आणि जातीभेदाच्या तक्रारीवरून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    आदित्य भवार, पुणे : कोथरूड परिसरात तीन मुलींवर झालेल्या कथित मारहाण आणि जातीवाचक अपमानाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पीडित मुलींनी न्यायासाठी थेट पोलीस आयुक्तालयात धरणे देत आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगाने पुढे सरकली आणि अखेर कोर्टाने या तक्रारीतील गंभीर मुद्द्यांची दखल घेत मोठा निर्णय दिला.

    छत्रपती संभाजीनगर येथील 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचारांना कंटाळून पुण्यात येऊन आश्रय घेतला होता. या महिलेला आधार देणाऱ्या तीन मुलींना मदत करण्याची शिक्षा भोगावी लागली, असे आरोप पीडितांनी केले. त्यांच्या मते, कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान जातीय शिवीगाळ, शाब्दिक अपमान तसेच मारहाणीचा अनुभव सहन करावा लागला.

    प्रकरणाचा आवाज वाढताच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर तसेच आमदार रोहित पवार यांनी थेट हस्तक्षेप केला आणि पीडित मुलींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचले.

    कोर्टाने नेमके काय निर्देश दिले?

    कोर्टाने तात्काळ निर्देश देत कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, कर्मचारी श्रुती कडणे, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे, महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे, हवालदार विनोद परदेशी, सायबर पोलीस विभागाचे धनंजय सानप आणि माजी पोलीस अधिकारी सखाराम सानप यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

    इतकेच नव्हे तर या प्रकरणाचा तपास स्वतंत्रपणे केला जावा, यासाठी संपूर्ण चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे वर्ग करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. आता तपास प्रक्रिया कशी पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    Maharashtra TimesBihar Exit Poll: काँग्रेसला केवळ 4 ते 8 जागा, तर NDA थेट 200 पार, POLL DIARY च्या एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
    आता हे प्रकरण पोलिसांना भारी पडणार का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. संबंधित प्रकरणाची समाज माध्यमांवर प्रचंड चर्चा झाली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली होती. अनेकांनी पीडित मुलींच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यामुळे आता या प्रकरणात कोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा