Alandi Dehu Traffic Change: कार्तिकी यात्रेनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहे. कोणते रस्ते बंद राहणार? पर्यायी व्यवस्था कशी? पार्किंगची सुविधा कुठे? जाणून घ्या.
दर वर्षीप्रमाणे यंदाही आळंदी आणि देहू परिसरात १० ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येणार आहेत. भाविक मोठ्या संख्येने आळंदीहून देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर व भंडारा डोंगराकडे दर्शनासाठी जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी मोशी, चाकण, दिघी, तळवडे, तळेगाव, मरकळमार्गे आळंदी आणि देहूकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना या कालावधीत प्रवेश बंद केला आहे. वाहनचालकांनी जयगणेश साम्राज्य चौक अलंकापुरम चौक-विश्रांतवाडी भोसरी अशा पर्यायी मार्गांचा वापर करावा; तसेच देहू कमान, कॅनबे चौक, देहूफाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा, मरकळ आदी मार्गावरून जड वाहनाना बंदी असेल.
Pune Politics : पुण्यात अजितदादा-फडणवीसांना शह देण्यासाठी शिंदेंची खेळी; मदतीला नवा भिडू शोधला, युतीची घोषणा
आळंदी व देहू परिसरातील पार्किंग व्यवस्था
-तळेकर पाटील चौकाजवळ (दक्षिण व उत्तर बाजू)
-आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव
-ज्ञानविलास कॉलेज परिसर
-मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक
-इंद्रायणी हॉस्पिटलसमोर
-विश्रांतवाडी-वडगाव रोड
-मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ
-आळंदी नगर परिषद शौचालयाजवळील पार्किंग
Pune Land Scam: एकही रुपयाविना व्यवहार झाला कसा? अजित पवारांकडून नोंदणी विभागावर खापर
आळंदी शहरात वाहनांना प्रवेशबंदी
आळंदी शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुणे आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी व मरकळ-आळंदी हे मुख्य रस्ते बंद राहणार आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा; तसेच, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. – विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

