Buldhana News : बुलढाण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. मलकापूरमधील तरूणीच्या लग्नाला काही दिवस बाकी होते. घरी लग्नाची तयारी सुरू असताना होत्याचं नव्हतं होऊन बसलं.
खुशबू परयाणी ही मलकापूर शहरातील प्रतिष्ठित समाजसेवक आणि व्यापारी ताराचंद परयाणी यांचे बंधू दीपक परयाणी यांची मुलगी होती. नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ती घराबाहेर पडली. मात्र, बीकेसी परिसरातील एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ रस्ता ओलांडत असताना, एका भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिच्या सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Buldhana Crime: लेक बनला हैवान! जन्मदात्या आईबापाला संपवलं, झोपेत असतानाच घातले कुऱ्हाडीचे घाव, अन् नंतर…
विशेष म्हणजे, खुशबूचा विवाह अवघ्या काही दिवसांवर, १२ फेब्रुवारी रोजी होणार होता. ती आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र, नियतीने तिच्यावर अचानक काळाचा घाला घातला. या दुर्घटनेमुळे मलकापूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खुशबूच्या निधनाने परयाणी कुटुंबासह त्यांचे परिचित आणि व्यावसायिक वर्तुळातही दुःखाचे सावट पसरले आहे. तिच्या मागे आई-वडील, भाऊ आणि काका असा परिवार आहे.
Buldhana News : चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करत तिला पुरलं, सकाळी… बुलढाण्यात हळहळ व्यक्त
या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरून वेळेवर कार्यालयात पोहोचणे आणि कामात स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत, अनेकदा रस्ता ओलांडताना किंवा वाहन चालवताना आपण निष्काळजीपणा करतो. यामुळेच अशा दुर्दैवी घटनांमध्ये वाढ होत आहे. आपला जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

