Pune Leopard Attack : सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक फेन्सिंग लावण्यात आलं आहे. पण त्याचा काहीच परिणाम या बिबट्यावर झाला नसल्याचं स्पष्ट झालं.
घटनेची वेळ 5 नोव्हेंबरची रात्री 9 वाजून 21 मिनिटांची असल्याचं समजतं. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक तरस मागे लागल्यानं बिबट्याने शेरकर यांच्या बंगल्याभोवती असलेल्या कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे या कंपाउंडला उच्च क्षमतेचे इलेक्ट्रिक फेन्सिंग बसवलेले असून, त्यात तब्बल 9 हजार व्होल्ट इतका करंट प्रवाहित होता. तरीही बिबट्याला कोणताही धक्का बसला नाही, हे पाहून वनविभाग आणि स्थानिक रहिवासी दोघेही थक्क झाले आहेत.
Pune Leopard Attack : 13 वर्षीय रोहनचा बिबट्याने जीव घेतला, पुण्यात नरभक्षक बिबट्याचा थरार, स्वसंरक्षणासाठी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा
बिबट्या काही वेळ या परिसरात फिरत राहिला, त्यादरम्यान फेन्सिंगशी जोडलेली सायरन यंत्रणा वाजली, मात्र तो न घाबरता आत फिरत राहिला आणि नंतर बाहेर निघून गेला. या प्रकारानंतर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यात सध्या बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने शासनाने झटका देणारी ‘शॉक मशीन’ बसविण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, या घटनेमुळे अशा यंत्रणांची परिणामकारकता कितपत आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे बिबट प्रवण भागात अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘त्यांनी एखादा बंद पडलेला साखर कारखाना घेऊन चालवून दाखवावा’, मंत्री विखे पाटील यांचं उध्दव ठाकरेंना आव्हान
स्वसंरक्षणासाठी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा
पुणे जिल्हा हा बिबट्या चा हॉटस्पॉट बनला असून त्याच्या दहशतीनं ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. आता या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ वाटेल त्या उपाययोजना करत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावच्या महिलांनी आणि पुरुषांनी थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टाच घातलाय. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करुन, नरडीचा घोट घेतो. अशा प्रसंगी शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातल्याचं चित्र आहे.

