Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची, हिवाळ्याची चाहूल लागली असून पश्चिम मध्य प्रदेशात शीतलहरीची शक्यता आहे. शीतलहरीमुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट अपेक्षित आहे.
तापमानात शुक्रवारपेक्षा घट
राज्यामध्ये मुंबईत सांताक्रूझ येथे किमान तापमान 21.2 तर कुलाबा येथे 23.5 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान सध्या सरासरी किमान तापमानाच्या आसपास आहे. किमान तापमानात शुक्रवारपेक्षा घट झाली मात्र कमाल तापमान फारसा दिलासा देणारे नव्हते. सांताक्रूझ येथे शनिवारी कमाल तापमान 34.5 म्हणजे शुक्रवारपेक्षा 2 अंशांनी अधिक होते.
Mumbai Weather : मुंबईत थंडीची चाहूल, दाट धुकं पसरलं; पण हवेची गुणवत्ता घसरली; सर्वाधिक खराब हवा कोणत्या भागात?
तर कुलाबा येथे 32.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कोकण विभागात शनिवारी डहाणू केंद्रावर किमान तापमान 19.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले. इतर केंद्रांवर अजूनही 20 अंशांहून अधिक किमान तापमान आहे.
मध्य महाराष्ट्रात किमान तापमान मोठ्या फरकाने खाली
मात्र त्याचवेळी मध्य महाराष्ट्रात किमान तापमान मोठ्या फरकाने खाली उतरले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील शीतलहरीचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रावर झाला असून जळगाव येथे शनिवारी 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून 5 अंशांनी कमी होते.
कोकणात पावसाची शक्यता, हवामान विभागाचं निशाणा, काय घ्यावी काळजी?
मुंबईत 14 नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात दिलासा
नाशिक येथेही 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईमध्ये मात्र 14 नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही. 32 ते 33 अंशांदरम्यान मुंबईत कमाल तापमान असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

