Narayan Rane News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जर तसं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यात संबंध तोडू, मी राजन तेली याला कुठलाही नेता आणि पदाधिकारी मानत नाही, राजन तेली आणि विशाल परब या दोन माणसांचा भाजपसोबत संबंध मानत नाही. कुठल्याही म्हणण्याला मी विरोध करेल. विशाल परब याने भाजपवर टीका केलीये, तो भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. फक्त मतदारसंघ नाहीतर जिल्ह्यात युती झालीच व्हावी, असं नारायण राणे म्हणाले.
Ratnagiri News: पत्नीसोबत धुणं धुवायला गेला, नदीपलीकडे काहीतरी दिसलं, पाण्यात उडी; ती ओरडत राहिली अन् तो…
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास युती करण्याचं ठरलेलं आहे. मला वाटतं युती व्हावी, दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा. युतीने ८० टक्के पेक्षा जास्त जागा युतीने घ्याव्यात आणि युती झाली तर घेतील असा माझा विश्वास आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटूंबात अंतर्गद वाद होऊ देणार नाही. आमच्या राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाही, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावलं होतं आणि त्यांचीही इच्छा आहे की युती व्हावी. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करतायेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली, मग इथे आता कसं काय झालं? पालकमंत्री आणि चव्हाणांनी बैठक घेऊन आमदार आणि खासदारांची काय इच्छा आहे पाहावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Ratnagiri News: यात्रेला गेले ते परतलेच नाहीत; देवीच्या दर्शनानंतर चक्कर, दोन रुग्णालय फिरले पण… दुर्दैवी घटना
राज-उद्धव युतीवर टीका
मुंबई महापलिका निवडणुकीसाठी प्रचार करावा लागतोय, सत्ता असताना मुंबई शहराचा कायापालट काय केलं? आणि आता काय आहे हे पाहावं. राज आणि उद्धव ठाकरे आपलं अस्तित्त्व तयार करण्यासाठी करतायेत, असं म्हणत राणेंनी निशाणा साधला.

