• Tue. Sep 8th, 2026

जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे –   व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 6, 2025
जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे –   व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे – महासंवाद




मुंबई, दि. ६ : मांतग व तत्सम जातींच्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)  मार्फत राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक,  छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्राची निवड करावी, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

जेईई व नीट प्रशिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी आर्टीने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी अंतिम निवड करण्यात आली असून अशा विद्यार्थ्यांची यादी आर्टीच्या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी https://cpetp.barti.in/ या संकेतस्थळावर जाऊन १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रशिक्षण केंद्राची निवड करावी. जेईई व नीटसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, दरमहा ६ हजार रुपये विद्यावेतन, त्याचबरोबर पुस्तकांसाठी वर्षातून एकवेळ पाच हजार रुपये आणि प्रशिक्षण केंद्रांना त्यांचे शुल्क आर्टीच्या वतीने देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक वारे यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ







विद्यार्थी हित, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धीसाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यावा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद
समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग आणि क्षमता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed