Neral Matheran Mini Train: माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला तीन द्वितीय, एक पारदर्शी (व्हिस्टाडोम), प्रथम आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामानवाहू असे सहा डबे असणार आहेत. सोमवार ते शुक्रवारदरम्यान अमन लॉज ते नेरळदरम्यान रोज सहा फेऱ्या धावतात. शनिवारी आणि रविवारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन फेऱ्या वाढवून एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात. रेल्वे प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन माथेरान मिनी ट्रेनने तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
सोसायट्यांची ‘एनओसी’च्या जाचातून मुक्तता, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे परिपत्रक, काय सांगतो नियम?
नवे वेळापत्रक
दररोज सोमवार ते शुक्रवार या काळात अमन लॉज ते नेरळदरम्यान सहा फेऱ्या धावणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवारी आणि रविवारी, संभाव्य गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने दोन अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे त्या दिवशी एकूण आठ फेऱ्या चालतील. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि तिकीट आगाऊ काढून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार, नेरळ ते माथेरान या मार्गावर सकाळी 8.50 आणि 10.25 या वेळांना गाड्या सुटतील. माथेरानहून नेरळकडे दुपारी 2.45 आणि 4.00 वाजता गाड्या धावतील.
- अमन लॉज ते माथेरान – सकाळी 8.45, 9.35, दुपारी 12.00, 2.45, 3.40, सायं. 5.45
- माथेरान ते अमन लॉज- सकाळी 8.20, 9.10, 11.35, दुपारी 2.00, 3.15, सायं. 5.20
आयोगाने अनेक उत्तरं दिलेली नाहीत, कोणाचा दबाव आहे तुम्हाला? देशपांडे संतापले!
शनिवार-रविवारी अतिरिक्त विशेष फेऱ्या
- अमन लॉज ते माथेरान सकाळी 10.30, दुपारी 1.35
- माथेरान ते अमन लॉज सकाळी 10.05, दुपारी 1.10
माथेरानमध्ये पुन्हा एकदा “हिल क्वीन” म्हणून ओळखली जाणारी ही मिनी ट्रेन धावणार असल्यामुळे, पर्यटकांना डोंगराळ परिसरातील हिरवाई, वळणदार घाट, आणि निसर्गरम्य दृश्यांचा जवळून आनंद घेता येईल.

