• Wed. Mar 11th, 2026

    परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 3, 2025
    परभणी जिल्ह्यातील २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    परभणी, दि. ३ (जिमाका): महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून, या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाड्यामध्ये करण्यात येणार आहे.

    महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण  विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परभणी जिल्ह्यासाठी ही अतिशय गौरवाची बाब असून २६५ अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.

    या योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता व बालसंगोपनासाठी आवश्यक असणारे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यास मदत होईल.

    परभणी, सेलू, जिंतूर, पूर्णा, मानवत, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, पालम या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार असून स्थानिक अंगणवाड्या आधुनिक शिक्षण व आरोग्य विकासाचे केंद्र म्हणून विकसित होतील. या प्रकल्पामुळे बालकांच्या वाढीचा, आरोग्याचा व पोषणस्थितीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल.

    महिला व बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे.

    अंगणवाडी केंद्रांचे नाव तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे

    तालुका परभणी – पारवा क्र.२, उमरी क्र.२,बोरवड बु क्र.१,पारवा क्र.३,कास्टगाव,पेडगाव क्र.१,ब्राम्हण गाव क्र. १,ब्राम्हण गाव क्र.३,ब्राम्हणगाव क्र.४,मांडाखळी क्र.३,साटला,झरी क्र.९,झरी क्र.६,सावगी खु-१,टाकळी क्र.६,सांवगी खु-२,सबर क्र.२, मांगणगाव क्र.२, मौजे नांदखेडा अंगणवाडी क्र.२,मौजे कोटमवाडी, मौजे कैलासवाडी अंगणवाडी, मौजे सायला (ख) अंगणवाडा-१, पिंपरी क्र.3, पाथरा क्र.2, पोखरणी क्र.7, तामसवाडी, पोखरणी क्र.4, आंबेटाकळी क्र.1, ताडपांगरी क्र.1, शिंगणापूर क्र.1, पिंगळी क्र.8, ब्रह्मपुरी क्र.1,ब्रह्मपुरी क्र. 2, साळापुरी क्र.2,दैठणा क्र. 8,पेडगाव,तरोडा,पिंपळगाव समी,आरवी, पेगरगव्हाण, माळसोन्ना,इंदेवाडी, कार्ला.

    तालुका सेलू- डासाळा क्र. २,राधे धामणगाव, डासाळा क्र. २, डेंगळी पिंपळगाव क्र.२, गोमवाकडी, गोहगाव, करडगाव, कवडधन, डिग्रस खुर्द, वाकी, पिंपराळा, वाई क्र.१,वालूर क्र.२, वालूर क्र.४, वालूर क्र.१०, हातनूर क्र. २,बोरगाव जहागीर, हट्टा, कुपटा क्र.१, रावा, सिमणगाव क्र. २, सिमणगाव क्र. १,निरवाडी खुर्द, निरवाडी बुद्रक,कुंभारी, हिस्सी, गुगळी धामणगाव, धनेगाव,मोरेगाव, शिंदे टाकळी, शेलवाडी, निपाणी टाकळी, बोरकीनी, तिडी पिंपळगाव, शिराळा, आहेर बोरगाव, राजवाडी, आडगाव दराडे, काजळी रोहिना, वलंगवाडी, केमापूर, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक, माले टाकळी.

    तालुका जिंतूर – कुंभारी, दुधगांव क्र. १, कौसडी क्र. ७, धानोरा (बु) क्र. १, धानोरा (बु) क्र. २, वरुड (नृ) क्र. २, वरुड क्र. ३, कौसडी क्र. ५, चारठाणा क्र. ७, चारठाणा क्र. ४, नागनगाव, कडसावंगी, आडगाव (बा) क्र.१, जवळा (खु), कोक क्र.१कोक क्र. २, मुडा क्र.१, हनवतखेडा, आसेगाव क्र. ०२, करवली, माथला, सोन्ना, इटाली क्र.२, जोगवाडा क्र. ३, सोनापुर क्र.१, रिडज क्र. १, पिंपळगाव क्र.. १ (गा), दुधनगाव, चामणी, चिंचोली काळे, पोखर्णी तांडा, दहेगाव क्र.१,वडाळी, सावंगी (म्हा) क्र. १, हिवरखेडा,भोसी क्र. १, चौंधरणी, कसर,सोरजा क्र. १, मानधानी, वाघी धा, कोठा, बामणी बु.,निवळी बु., गणपुर, हलविरा, मानकेश्वर (चा), डोहरा, गोंधळा, शेक, अकोली, माक,सावरगाव,सोस, येसेगाव,बलसा.

    तालुका पुर्णा – वझर क्र.१,कळगाव क्र. १,गौर क्र. ३, धनगर टाकळी क्र.१,आलेगाव क्र.१, हिवरा क्र.१, पिंपळा लोंखडे, रुज क्र.१,कानडखेडा क्र. १, कान्हेगाव क्र.१, ताडकळस क्र. ३,  हटकरवाडी, कानडखेडा, फुकटगाव, एरंडेश्वर क्र. १, एरंडेश्वर क्र. ४,कातनेश्वर क्र. ४.

    तालुका मानवत – अटोळा, कोथाळा क्र.१, कोथाळा क्र.२,सावंगी मगर क्र.२, गोगलगाव क्र.२,देवलगाव क्र.१, रुढी क्र.२,केकर जवळा क्र.1, केकर जवळा क्र.2, खडकवाडी,रत्नापुर,रामेटाकळी क्र.1, रामपुरी क्र.1,हाटकरवाडी क्र.1, लोहरा क्र.1, मंगरुळ पा. प क्र.4, इटाळा ब्र, खरबा, रामपुरी बु.,वांगी, थार, वझुर बु., हमदापुर,हटकरवाडा,रामेटाकळी,जाब, हसनापुर,शहापूर.

    तालुका गंगाखेड – धारखेड क्र.1,धारासुर क्र.3, सायाळा क्र.2, खंडाळी क्र.2, मरडसगाव क्र.1, बोर्ड क्र.2, कोद्री क्र.1, कोद्री क्र.2, माखणी क्र.3, बडवणी क्र.2, इसाद क्र.5, महातपुरी क्र.5, मौजे खळी, मौजे डोंगरगाव, मौजे अकोली,मौजे मानकादेवी,मौजे तांदुळवाडी,मौजे बडवणी, मौजे सांगळेवाडी, मौजे भेंडवाडी,मौजे सलमोहा,मौजे डोंगरजवळा,मौजे माखणी, मौजे खंडाळी, मौजे वाथा,मौजे वलवाडी,मौजे कासारवाडा,मौजे ढवळकवाडी,मौजे महातपुरी, मौजे वनपिंपळा, मौजे पांगळा.

    तालुका सोनपेठ – डिघोळ क्र.4, धामोनी क्र.1, वाघलगाव,थडीउक्कडगाव, गंगापिंप्री, वाडी पिंपळगाव, शेळगाव क्र.3, शेळगाव क्र.2,नरवाडी क्र.1,निळा क्र.1,वंदन क्र.1, करम तांडा, चतुर नाईक तांडा, उखळी क्र.2, पोहडूळ,पांहडूळतांडा, बनवाडी.

    तालुका पाथरी – गोपेगाव क्र.1,कासापुरी, लिंबा क्र.4,देवनांद्रा क्र.4, रेनापुर क्र.1, तूरा क्र.1, टाकळगव्हाण, हादगाव क्र.2, रामपूरी क्र.3, मरडसगाव क्र.1, बाभळगाव क्र.4, विटा क्र.1, खर्डा क्र.1, बाभळगाव क्र.2.

    तालुका पालम – फरकंडा क्र.1, गुळखंड, आरखेड क्र.1, फळा क्र.1, पेठ शिवनी क्र.3, सातेगाव क्र.1,शेख राजुर क्र.2, पेठपिंपळगाव क्र.3, वनभुजवाडी, आडगाव, नाव्हलगाव,चाटोरी क्र.4, बदरवाडी, खड़ी क्र.1,तांदुळवाडी क्र.1, पेंडू खु. क्र.1.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed