मनसे नेते राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इफ्तार पार्टीतला फोटो टाकत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘भाजपचा आगरी-कोळी-भूमिपुत्र प्रेम फक्त निवडणुकीपुरतं’
“निवडणुका आल्या की आगरी-कोळी-भूमिपुत्र बांधव आठवतात, पण सत्ता मिळाल्यावर विसर पडतो. खरंच आमच्या बांधवांचा एवढाच पुळका आहे तर अजून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव का दिलं नाही हो?”, असा सवाल राजू पाटील यांनी केला. “२७ गावं कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळणार असे सांगून त्यावेळी संघर्ष समितीचे सदस्य भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले, तसेच या गावांच्या विकासासाठी ६५०० कोटी रूपये निधी देऊ सांगितले. पण आजतागायत एक छदाम दिली नाही. तसेच २७ गावांच्या वेगळ्या नगरपालिकेचा विषय सर्वोच्च न्यायालयात सडवत ठेऊन आम्हा भूमिपुत्र बांधवांच्या तोंडाला तुम्ही पानंच पुसलीना?”, असादेखील सवाल राजू पाटील यांनी केला.ज्या मतदारांची नावं सांगितली आहेत त्यांचा पुनरूच्चार करून कदाचित तुम्हाला तुमच्याच मंत्र्याला अडचणीत आणायचे, त्यांच्या मंत्रिपदावर डोळा ठेवण्याचे तर तुमच्या मनात नाही ना? असो, तुमचे राजकारण तुम्हाला ठाऊक! दुबार मतदार यादीत पांडे, देशपांडे, पठाण असो की पाटील असो, ती वगळा ही आमची भूमिका आहे. परंतु आगरी-कोळी समाजाच्या भावनांशी खेळणं, त्यांच्या संघर्षाचा फायदा घेणं हीच भाजपची राजकीय सवय बनली आहे. निवडणुकीत मतांची गरज असेल तेव्हा आपले बांधव, आणि निवडून आल्यावर कोण बांधव? अशीच तुमची भूमिका”, अशी टीका राजू पाटील यांनी केली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीला वेग, अंतिम आरक्षण जाहीर, उमेदवारांच्या हालचालींना गती
‘दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केलंच’
“मतदार याद्यांतील घोळ, नावं गायब होणं, दुबार नोंदी आणि मतचोरीचे आरोप यावर भाजपची तळमळ आता उघडपणे दिसू लागली आहे. निवडणूक आयोगावरील आरोप सुरू होताच भाजपची झोप उडाली, आणि नेहमीप्रमाणे हिंदू-मुस्लिम कार्ड खेळून मुद्दा वळवायचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण गंमत बघा शेलार यांच्या वक्तव्याने स्वतःच मान्य केलं की मविआ आणि मनसेच्या दुबार मतदारांबाबत भाजपलाच सगळं माहीत होतं. म्हणजेच घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही”, असं राजू पाटील म्हणाले.
बीडमध्ये पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे लढत? महायुतीला तडा जाणार? पडद्यामागच्या घडामोडींनी सस्पेन्स वाढवला
“भ्रष्टाचारावर बोट ठेवलं की भाजप चिडतो, कारण बोट जिथे ठेवतो तिथे भाजपच सापडतो. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं नाही, उलट दिशाभूल करायची हीच त्यांची सोयीची पद्धत आहे. भाजपचा हा थयथयाट म्हणजे सत्याचा मुखवटा फाडून स्वतःचं कुरूप चेहरा दाखवणं”, अशी टीका राजू पाटील यांनी केली. “बाकी मायबाप जनता सुजाण आहेच. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवेल”, असंदेखील राजू पाटील म्हणाले.

