मुंबई, दि. २९ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सायं ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण झाले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार रवींद्र, आमदार अमित साटम तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, सचिव तथा राजशिष्टाचार मुख्याधिकारी राजेश गावंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000
