• Sat. Jul 11th, 2026

    एमआयडीसीची तूट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 28, 2025
    एमआयडीसीची तूट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे – महासंवाद




    मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) आर्थिक तूट भरून काढण्यासाठी विभागाने योग्य निर्णय घेण्याच्या सूचना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्या. विधान भवन, मुंबई येथे आज दिनांक 28 ऑक्टोबर, 2025 रोजी पावसाळी अधिवेशन – 2025 मध्ये विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न क्र.3005 अन्वये महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाची तूट भरुन काढण्यासाठीची उपाययोजना, या विषयासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी त्यांनी ही सूचना केली.

    यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार शशिकांत शिंदे, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) शिवदर्शन साठ्ये, सह सचिव राजेश तारवी, उप सचिव मोहन काकड उपस्थित होते.

    यावेळी एमआयडीसीच्या संदर्भात विविध विषयासंबंधी उपस्थित केले जाणारे मुद्दे, पाणी  दरवाढ, एमआयडीसीच्या जमिनी उद्योगांना देतांना दिल्या जाणाऱ्या सवलती, त्यामुळे निर्माण होणारी तूट, तसेच भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांना अटी घालण्याबाबतची उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली.

    या अनुषंगाने सभापती प्रा. राम शिंदे यांनी उद्योग विभागाला बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्यांवर प्रभावी उपाययोजना आखण्याच्या आणि तूट भरून काढण्यासाठी ठोस निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

    ००००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed