Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. आठ दिवसात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत, मात्र अद्याप यश आलेले नाही.
आता दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच तालुक्यातील चेकपिपरी येथे शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच, एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गणेशपीपरी गावात ही घटना घडली. चेकपिपरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वाघाला जेरबंद करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. परंतु, अद्याप वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकरी भयभीत असून वनविभागाच्या विरोधात आक्रोश करीत आहे.
बैलांना चारण्यासाठी शेतात सोडलं, परत नेण्यासाठी गेले पण पुन्हा आले नाही; अख्खं गाव शेतात गेलं अन् समोरचं दृश्य बघून हादरलं
पिंजरे लावलेत, विशेष पथक सक्रिय
आठ दिवसात वाघाने दोन बळी घेतले. त्यामुळे गावकरी संताप व्यक्त करीत आहेत. वाघाला पकडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. विषेश पथक सक्रिय असले तरी अद्याप त्यांना यश आले नाही.
शेतकऱ्यावर क्रूर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ वाघाचा गोंडपिपरी शहरामध्ये मुक्त संचार; नागरिकांमध्ये दहशत, जेरबंद करण्याचं वनविभागापुढे आव्हान
वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा बळी
शेतात काम करायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली. वासुदेव वेटे असे बळी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या आकापूर येथील ते रहिवाशी होते. ते शेतात गेले मात्र परत आले नाही. शोधाशोध केले असतात त्यांचा मृतदेह सापडला. याच आठवड्यात गोंडपिपरी तालुक्यात वाघाने शेतकऱ्याचे तुकडे तुकडे केले होते. वाघाच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. वन विभागाचा अधिकाऱ्यांजवळ शेतकऱ्यांनी आक्रोश केला.शेवटी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी परवानगी दिली.

