Beed Crime: बीडमधल्या धक्कादायक घटनेने सध्या सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. एका चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तिला नदीमध्ये फेकून देण्यात आले आहे.
मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राठोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, पोलिस तपासानुसार, मुलीच्या अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक होता तसेच हातात काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या होत्या. एवढ्या गोंडस बाळाला पाण्यात कोणी आणि का टाकले? असावे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
Pune News: आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये, बाहेर पडताच जैन बांधवांकडून घेराव, नेमकं काय घडलं?
दरम्यान, या घटनेमुळे बीड शहरात संताप आणि दुःखाची लाट पसरली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे नारे देत समाज जागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतानाही अशा घटना घडत असल्याने शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
चिमुकलीला बिंदुसरा नदीवरील पुलावरून फेकण्यात आले की कोणी नदीत उतरून ठेवले, याबाबतही तपास सुरू आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या निर्दयी कृतीचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
Dharashiv News: संग्राम जगताप पुन्हा ती भूमिका घेणार नाहीत – दत्ता भरणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे मुस्लिम विरोधी वारंवार भूमिका घेत होते, पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांना समज देऊन देखील त्यांनी मुस्लिम विरोधी भूमिका कायम ठेवली होती. आमदार संग्राम जगताप यांना पक्षाच्या बैठकीमध्ये अजितदादांनी सांगितल आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप हे पुन्हा ती भूमिका घेणार नाहीत, असं वक्तव्य पक्षाचे नेते तथा मंत्री दत्ता भरणेंनी केलं आहे.

