Kalyan News : एका महिलेकडून तिचा सोन्याचा हार कचऱ्यात गेला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी यासाठी महिलेची मदती केली, तत्परता दाखवत त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हार शोधण्यास महिलेला मदत केली. या घटनेची शहरात एकच चर्चा आहे.
नेमकं काय घडलं?
नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास कल्याण पूर्व इथे केडीएमसीच्या सुमित कंपनीतील सफाई कर्मचारी विविध ठिकाणाहून कचरा गोळा करण्याचं काम करत होते. हा गोळा केलेला कचरा कचोरे टेकडी येथील इंटरकटिंग केंद्रावर पाठवण्यात येत होता. यावेळी सुमित कंपन्यांचे अधिकारी समीर खाडे यांना फोनवर एका महिलेने कचऱ्यात सोन्याचा हार टाकल्याची माहिती मिळाली.
Gold Rate : सोन्याची झळाळी वाढतीच, 15 दिवसांत सोन्याच्या दरात 11 हजारांनी वाढ; काय आहेत वाढीमागची कारणं?
सोन्याचा हार कचऱ्यात गेल्याची माहिती मिळाली
ही माहिती मिळाल्यानंतर समीर खाडे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितलं. तसंच गोळा केलेला कचरा ज्या ठिकाणी पाठवला जात होता, त्या कचोरे टेकडी येथील इंटरकटिंग केंद्रावरील गाडी चालकाला, तसंच इतर संबंधिकांना ही सोन्याच्या हारची माहिती देण्यात आली. त्याशिवाय ज्या महिलेचा हार कचऱ्यात गेला होता, त्या महिलेलाही इंटरकटिंग केंद्रावर बोलवण्यात आलं. या केंद्रावर त्यावेळी आलेला कचरा महिला आणि कुटुंबियांसमोर सफाई कर्मचाऱ्यांनी वेगळा केला.
Navi Mumbai Rain |15 दिवसांतच रस्त्यांची दुर्दशा; रेती, खडी अधिकाऱ्यांना भेट, मनसे आक्रमक
महिलेचं कुटुंब सुखावलं
त्यानंतर महिला, तिचे कुटुंबिय आणि सफाई कर्मचारी या सर्वांनी मिळून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोन्याच्या हाराचा शोध घेतला. या शोधावेळी कचऱ्यात गेलेला महिलेचा हार सापडला. हार लगेच महिलेला देण्यात आला. इतक्या मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून महिला हार मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान होतं. तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सफाई कर्मचाऱ्यांनी महिलेची मदत करत तिला मौल्यवान सोन्याचा हार मिळवून दिल्याने त्यांचं संपूर्ण परिसरासह कल्याणमधून कौतुक होत आहे. हार मिळाल्याने महिलेचं कुटुंब सुखावलं आहे.

