Navi Mumbai News: दिवाळीतच कोकणातील पहिली आंब्याची पेटी नवी मुंबईत दाखल
कोकणातील यंदाच्या हंगामातील पहिली हापूस आंब्याची पेटी नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. सिंधुदुर्गमधील बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी देवगडहून पाठवलेली ही पेटी मंगळवारी बाजारात पोहोचली. दिवाळीच्या सणात अजून पावसाचे थैमान असतानाच कोकणचा राजाही बाजारात दाखल झाल्याने आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे.
