Vashi Raheja Residency Fire : वाशी सेक्टर १४ येथील रहेजा रेसिडेन्सी या १२ मजली इमारतीत लागलेल्या आगीत होरपळून एकूण चौघांचा मृत्यू झाला
वाशी सेक्टर १४ येथील रहेजा रेसिडेन्सी या १२ मजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली. या आगीत बाराव्या मजल्यावर राहणारे ४४ वर्षीय सुंदर बालाकृष्णन, त्यांची ३९ वर्षीय पत्नी पूजा राजन आणि त्यांची ६ वर्षांची मुलगी वेदिका बालाकृष्णन यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीतच संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या कमला जैन या वृद्ध महिलेचाही दुर्दैवी अंत झाला. कमला जैन त्यांचा मुलगा महावीर (५१), सून भावना (४९) आणि नातू कृष्ण (२१) यांच्यासोबत राहत होत्या. आगीच्या वेळी कमला जैन यांचा मुलगा, सून आणि नातू घरातच होते, तर नात बाहेर गेली होती.
Pune Crime : तुमचं नाव पहलगाम हल्ल्यात आलंय, पुण्यातील वृद्धाला फोन, 16 दिवसात वेगवान घडामोडी अन् अखेर 14460000 रुपयांचा…
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले की, “आमच्या पोलिस पथकाने इमारतीला भेट देऊन पाहणी केली. सध्या आगीचे नेमके कारण कळलेले नाही, परंतु जैन कुटुंबाने दिवाळीसाठी लावलेल्या दिव्यांमुळे किंवा एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. विद्युत सुरक्षा विभागाचे अधिकारी अहवाल सादर केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.”
Kabaddi Player Death : ऐन दिवाळीत प्रो कबड्डी लीगच्या चाहत्यांवर शोककळा, यू मुंबाच्या युवा कबड्डीपटूसह जयपूर पिंक पँथर सदस्याचा मृत्यू
इमारतीचे अर्धवेळ व्यवस्थापक संजय उबाळे यांनी सांगितले की, “आग लागल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे गुदमरल्यासारखे वाटल्याने कुटुंबाने घाबरुन टेरेसवर जाण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, कमला जैन अंथरुणाला खिळलेल्या असल्याने त्यांना वाचवता आले नाही.” आगीमुळे इमारतीच्या वरच्या तीन मजल्यांवरील १० रहिवाशांना गुदमरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

