Mumbai man beaten to death: मुंबईतील गोरेगाव परिसरात एका २६ वर्षीय तरुणाला मोबाईल चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
हातपाय बांधून, निर्दय मारहाण
गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल परमा याला स्थानिकांनी चोरीच्या संशयावरून पकडले. अफवांच्या भरात आणि संशयाच्या आधारे काही लोकांनी त्याचे हात-पाय बांधले आणि रागाच्या भरात त्याला निर्दयपणे मारहाण केली. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रस्त्यावरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Mumbai News: रस्त्यावरील फटाकेविक्रेते रडारवर; हजारो रुपयांचे फटाके पोलिसांकडून जप्त, विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
घटनेची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली. यावरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सलमान मोहम्मद खान, इसामुल्ला खान, गौतम आणि राजीव गुप्ता या चौघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध खून, अनधिकृत जमाव तयार करणे आणि इतर कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.
अफवांचे विष पुन्हा प्राणघातक ठरले
मुंबईसारख्या प्रगत शहरातही अफवा आणि संशयामुळे अशा घटना घडतात, हेच या प्रकरणातून पुन्हा एकदा दिसून आले. गेल्या काही वर्षांत चोरी किंवा बालअपहरणाच्या अफवांवरून जमावाने हल्ले केल्याच्या घटना अनेकदा नोंदवल्या गेल्या आहेत. गोरेगावमधील हा प्रकार त्याच मालिकेतील आणखी एक दुर्दैवी दुवा ठरला आहे.
जरांगेंच्या बालेकिल्ल्यात छगन भुजबळांचा एल्गार, ओबीसींच्या मेळाव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
बोरीवली स्थानकावर वेगळी धक्कादायक घटना
मुंबईत याच आठवड्यात आणखी एक अस्वस्थ करणारा प्रकार घडला. बोरीवली रेल्वे स्थानकावर 19 ऑक्टोबरच्या पहाटे 1.30 वाजता एका महिलेवर लैंगिक छळाचा प्रकार घडला. 28 वर्षीय आरोपीने मद्यधुंद अवस्थेत त्या महिलेला स्पर्श करून गैरवर्तन केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला तिच्या आईच्या निधनानंतर नागपूरहून मुंबईत आली होती आणि प्रवासाच्या प्रतिक्षेत ती प्लॅटफॉर्मवर बसली होती. या घटनेने मुंबईच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

