Pune crime news: पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हे गुन्हेगार आता पोलिसांनाही लक्ष्य करत आहेत. मार्केट यार्ड परिसरात वाहतूक पोलिसाला ट्रकचालक आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली आहे,.
अटक करण्यात आलेल्यांची नावे सुमीत सुभाष सरकटे (३४, रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे (३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मनजीत सुभाष कांबळे (२८, रा. घोरपडी गाव) अशी आहेत. या प्रकरणात हवालदार महेश सुभाष साळुंखे (३९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली असून ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
‘देशावर संकट आल्यावर मोठे लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेतअधिक माहिती अशी की, गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास साळुंखे हे ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौकाजवळून एक ट्रक अतिवेगाने जात असल्याचे त्यांनी पाहिले. अपघात होण्याची शक्यता ओळखून त्यांनी तत्परतेने ट्रकला प्रवेशद्वार क्रमांक ९ जवळ अडवले. त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी चालकाला धोपटण्याचा प्रयत्न केला, मात्र साळुंखे यांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले.
यानंतर ट्रकचालकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच आरोपींनी साळुंखे यांच्यावर हल्ला चढवला. हातातील धातूच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला. जखमी अवस्थेतही साळुंखे यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
या घटनेनंतर मार्केट यार्ड पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून आरोपींना शोध मोहीम राबवली आणि काही तासांतच तिघांना अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून सुरू आहे. अलीकडच्या काळात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

