Chandhshaili Ghat Pick Up Overturn : अस्तंबा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी उलटून भीषण अपघात झाला.
कसा झाला अपघात?
अस्तंबा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. चांदशैली घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चांदशैली घाटात अनेक वळणं असून अपघातप्रवण क्षेत्र मानले जाते.पिकअप अपघातात दहापेक्षा अधिक भाविक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मदत कार्य वेगाने सुरु करुन जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
Prem Birhade : लंडनमध्ये नोकरी गमावली, विद्यार्थ्यासाठी पुण्यातील कॉलेजसमोर ‘वंचित’चं आंदोलन; प्राचार्या म्हणतात, प्रेम बिऱ्हाडे…
भीषण बस अपघातात १२ जण जखमी
दुसरीकडे,रामगड येथे NH-33 वर एका भीषण अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. रांचीहून कोडरमाकडे जाणाऱ्या बसला एका ट्रेलर ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या धडकेत बस आणि ट्रक दोन्ही उलटल्यामुळे NH-33 वर वाहतूक कोंडी झाली. जखमींना रामगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाचाळवीरांना आवरा, संग्राम जगतापांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या
रामगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) परमेश्वर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार “बस कोडरमाकडे जात होती तेव्हा मागून एका ट्रेलर ट्रकने तिला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहने उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.”
Kruthika Reddy : डॉक्टर बायकोचा जीव मी घेतलाच नाही, डॉ. महेंद्रच्या दाव्याने मोठा ट्विस्ट, जवळच्या मैत्रिणीच्या एन्ट्रीने खळबळ
अपघातानंतर NH-33 वरील वाहतूक काही तास विस्कळीत झालेली होती, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority of India) टीमने स्थानिकांच्या मदतीने वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. हा अपघात गुरुवारी झाला होता.

