पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्याआधी ॲक्शन मोडवर आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं. यानंतर नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील राजभवन येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या महत्त्वाची बैठक पार पडल्याची चर्चा आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कानमंत्र बहुमुल्याचा आहे. विशेष म्हणजे मोदी यांच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस लगेच कामालाही लागणार आहेत. महाराष्ट्र भाजपच्या गोटात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखत आहे. या निवडणुकीत सर्वाधिक ठिकाणी जिंकून येऊन महायुतीत मोठा भाऊ म्हणून छाप टाकावी, असा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. ते राज्यभरात विभागनिहाय आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
फडणवीस उद्या दोन जिल्ह्यांमध्ये जाणार
देवेंद्र फडणवीस हे उद्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस दोन्ही जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. फडणवीस जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा आढावा घेणार आहेत. यासाठी बोलावलेल्या आढावा बैठकीला पक्षाचे स्थानिक जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला केवळ अपेक्षित नेते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.
महाविकास आघाडीची चिंता वाढणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ज्या हालचाली सुरु आहेत ते पाहता महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाणी होणं अपेक्षित आहे. कारण भाजप आतापासून कामाला लागली आहे. भाजप राज्यभरात तयारीला लागली आहे. भाजपची रणनीती विरोधकांना धक्का देणारी असू शकते. यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढू शकते. अशा काळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी देखील रणनीती आखण्यास सुरुवात करणं अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रचंड प्रतिष्ठेच्या असणार आहेत. त्यामुळे कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा