Manoj Jarange Patil : आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगड येथे दसरा मेळावा पार पडला. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केलेल्या एका विधानामुळे सर्व उपस्थित असलेले लोक चांगलेच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात मराठ्यांनी जीआर घेऊन लढाई जिंकली. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो की लई दिवसाचा, मला त्याची चिंता नाही. कारण जीवनात येऊन जे सिद्द करायचं होतं ते मी सिद्ध केलं आहे. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता, तो होरपळताना बघवला जात नव्हता. मी कधी नाटक केलं नाही, मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. एक गोष्ट खरी आहे की, एखाद्यावेळी एक-दोन पाऊलं मागे-पुढे सरकवले. एखाद्यावेळी चूक पण झाली असेल, पण मला जिसत होतं, समाज तडफडतो आहे. लेकीबाळी, पोरंबाळं जर मोठं करायचं असेल तर, शेतीबरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं आहे. आम्ही रात्रंदिवस तुटून पडलो. माझ्या समाजाची इच्छा होती. त्याच्या मुलांना नोकरीपासून आणि शिक्षणापासून लांब राहायला लागू नये’, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Dhananjay Munde : भगवानगडावर धनंजय मुंडे सुरेश धसांवर अप्रत्यक्ष बरसले, पंकजांचं कौतुक करत म्हणाले, 250 दिवस…
‘आपल्याला जे मिळालं ते खूप मिळालं, समाधानी राहत जा. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर सर्व आणलं आहे. तोडं हुशारीनं चला, खाताना विचार करा, गरम आहे की गार आहे. मराठ्यांनी यापुढे शासक बनायचं आणि प्रशासक बनायचं. शासक बनलात तर कुणाला मागायची गरज नाही पडणार. जातीला सांभाळायचं असेल तर, तुम्हाला शासक बनावं लागेल. प्रशासनामध्ये एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभं राहावं लागतं’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाला आवाहन केलं आहे.

