• Sat. Mar 7th, 2026
    तीन मुलांना मागे सोडून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, कुटुंबावर शोककळा; हृदयद्रावक घटनेने धाराशिवमध्ये हळहळ

    Dharashiv News : धाराशिवमध्ये २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिवृष्टी, कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी चिंतेत असून असा टोकाचा निर्णय घेतला जात असल्याचं चित्र आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दसऱ्याला दुर्दैवी घटना समोर आली आहे. अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे, वय वर्ष ४५, या शेतकऱ्याने कर्ज आणि अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 तासांतच धाराशिव जिल्ह्यात दुसरी दुर्दैवी घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील पोपट केशव पवार, वय वर्ष ५५, या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. नापिकी, कर्ज आणि अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आहे.

    धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. उभी पिकं गुडघाभर पाण्यात गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. वाढतं कर्ज, शेतीत होणारं नुकसान, नापिकी, आस्मानी संकट यामुळे शेतकऱ्याला कुठलाच पर्याय दिसत नसल्याचं चित्र आहे. याच विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. धाराशिव जिल्ह्यात 24 तासांत दोन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
    Maharashtra Timesबाप-लेक शेतात गेले आणि अनर्थ घडला, तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; दसऱ्याच्या दिवशी कुटुंब शोकसागरात
    पोपट केशव पवार यांनी गुरुवारी सकाळी स्वतःच्या राहत्या घरात विष प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं. पोपट पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाचा बोजा होता. यावर्षी झालेली अतिवृष्टी, शेतात झालेलं नुकसान आणि वाढतं कर्ज यामुळे पोपट पवार यांनी टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला.
    Maharashtra TimesJalgaon News : देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, वाटेत पती-पत्नीसोबत अनपेक्षित घटना; दुचाकीसमोर गाय आली आणि… महिलेचा दुर्दैवी शेवट

    अतिवृष्टीनं हातातोंडाशी आलेला घास गेला…शेतकरी हतबल, सरकारकडे काय केली मागणी?

    पोपट पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोपट पवार यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. लागोपाठ झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा