Pune Rave Party Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर यांच्या ‘इन्स्टाग्राम चॅट’चा उल्लेख पोलिसांनी आरोपपत्रात केला असून त्यात अमली पदार्थ मागवल्याचे काही मेसेज असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे पोलिसांनी २७ जुलै रोजी खराडीतील हॉटेलमध्ये छापा टाकला होता. त्या वेळी प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. तेथून कोकेन आणि गांजा जप्त केलेला होता. त्याच ठिकाणी २५ जुलैलाही पार्टी झाली होती, असा दावा पोलिसांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी खेवलकर यांच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या होत्या. अटकेनंतर आरोपींच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता मिळालेल्या अहवालात ड्रग्ज सेवनाचे पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये समाविष्ट केला आहे.
मोदींच्या बर्थडेला ड्रोन उडवले, पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय, वसंत मोरेंनी मुरलीधर मोहोळांना घेरलं
प्रांजल खेवलकर यांच्या ‘इन्स्टाग्राम चॅट’चा उल्लेखही पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. त्यात अमली पदार्थ मागवल्याचे काही मेसेज असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे अमली पदार्थ सेवनाच्या आरोपातून खेवलकर यांना दिलासा मिळाला असला, तरी पार्टीचे आयोजन आणि अमली पदार्थ बाळगण्याबाबत तपास अद्यापही सुरुच आहे. प्रांजल खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला असून, त्यांनी दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे.
Crime News : वैद्यकीय विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, हॉस्टेल रुममध्येच जीवनाची अखेर, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा, महाराष्ट्र हादरला
खेवलकर यांच्यासह अन्य आरोपींवर अमली पदार्थ बाळगण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी अमली पदार्थ का बाळगले होते, ते त्यांनी कुठून आणले होते, याचाही तपास सुरु आहे. आरोपींनी ड्रग्ज सेवन केलं होतं, की नव्हतं हा मुद्दा गौण आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.
Political News : भाजपने गेम फिरवला, जुना साथीदार पुन्हा सोबतीला; विनोद तावडेंची भेट, निवडणुकीत उलटफेर थेट!
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
मी आधीपासूनच सांगत होतो की, कथित रेव्ह पार्टीत काहीही तथ्य नाही, परंतु पोलिसांनी हे सर्व घडवून आणलं आहे, आता न्यायालय जो निकाल देईल तो देईल. मात्र रिपोर्टमध्ये असे काही आढळून आलेलं नसल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

