Dadar Swimming Pool Minor Girls Assault : दादर येथील जलतरण तलावात बारा आणि तेरा वर्ष वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींना आक्षेपार्ह स्पर्श करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तीस वर्षीय तरुणावर होता.
बारा आणि तेरा वर्ष वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींना आक्षेपार्ह स्पर्श करत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तीस वर्षीय तरुणावर होता. ही घटना सहा मार्च २०२० रोजी घडली होती.
काय झालं होतं नेमकं?
१३ वर्षीय मुलीला घडलेला प्रकार लक्षात येताच तिने तो महिला प्रशिक्षक आणि जीवरक्षकाला सांगितला. त्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला बोलवून जाब विचारला. मुलीने त्याला ओळखले. त्यानंतर त्या मुलीचे पालक आले असता, बारा वर्षांच्या अन्य एका मुलीनेही त्याच तरुणाकडे बोट दाखवून आक्षेपार्ह प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १३ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआर दाखल केला होता.
‘दादर येथील जलतरण तलावात त्यावेळी ३० जण होते. कथित पीडित मुलींनी चुकून माझ्याकडे बोट दाखवले. शिवाय एफआयआर नोंदवण्यातही विलंब झाला आहे. तसेच सीसीटीव्हीचे पुरावेही मांडण्यात आलेले नाही’ अशा स्वरूपाचा युक्तिवाद आरोपीने स्वत:च्या बचावार्थ न्यायालयात केला.
Ratnagiri Crime : भक्ती मयेकरला कॉल करुन छळणाऱ्या सीताराम वीरबाबत मोठी अपडेट, पोलीस तपासात रिक्षावाल्याने काय सांगितलं?
‘दोन्ही मुली घाबरलेल्या आणि रडत होत्या. त्यामुळे एफआयआर नोंदवण्यात एक दिवसाचा विलंब झाला. शिवाय जलतरण तलावाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याने ते पुरावे नाहीत’, असे स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्याने न्यायालयात मांडले.
बळीराजा संकटात, माय-भगिनींचे अश्रू पुसायचेत; नवी मुंबईत एकनाथ शिंदेंचं भाषण
सरकारी पक्षाने दोन्ही पीडित लहान मुलींसह आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्यानंतर सर्व पुरावे लक्षात घेत न्यायाधीश बी. आर. गारे यांनी आरोपीला दोषी ठरवले.
Pune Crime : नऊ महिन्यांच्या बाळाची आई… वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय, सासू-नणंदेबाबत म्हणाले…
कोर्ट काय म्हणालं?
‘संबंधित गुन्ह्याच्या कृतीबाबत पीडित मुलींनी तात्काळ जलतरण तलावाच्या ठिकाणीच आरोपीला ओळखले आणि नंतर न्यायालयातही ओळखले. हा महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच सीसीटीव्ही दृष्ये आणि एफआयआर विलंब याबाबत सरकारी पक्षाने समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आरोपीने मुलींचा पाठलाग करत दुष्कृत्य केल्याचं स्पष्ट होतं’, असे निरीक्षण न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात नोंदवले.

