Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार अून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच शनिवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथ्याचा परिसर, कोल्हापूर घाटमाथ्याचा परिसर, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
Jalindar Kamthe : अजित पवारांची शांतीत क्रांती, पुण्यात भाजपचा अस्वस्थ नेता फोडला, प्रभावी नेता ‘कमळ’ सोडून ‘घड्याळ’ बांधणार
पुण्यात कशी असणार स्थिती?
पुण्यासाठी पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. एकीकडे राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाडा आणि कोकणात २७ आणि २८ सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर 28 आणि 29 सप्टेंबरला पावसाचा जोर वाढेल.
दरम्यान, पुण्यात बुधवारी दिवसभरात कमाल 29.6 आणि किमान 20.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

