Solapur Man Ends Life : सोलापुरात एका 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आयुष्याची शेवट केली. त्याने टोकाचं पाऊल उचलण्याआधी इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर करत आपला निर्णय जाहीरपणे सांगितला होता. त्याच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, पण….
प्रज्वल कैनुरेने बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घरामध्ये गळफास घेतल्याचं त्याच्या घरातील नातलगांना समजलं. भाऊ रोहित याने नातलगांच्या मदतीने त्याच्या गळ्याचा फास सोडवून खाली उतरवलं. त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
Solapur News : कारला कट मारल्यानंतर अनमोलला संपवलं; माझे ते दोन शब्द ऐकले असते, तर…; ड्रायव्हरची धक्कादायक माहिती
प्रज्वल सोलापूर मार्केट यार्डात काम करायचा –
प्रज्वल कैनुरे हा सोलापूर शहरातील मार्केट यार्ड येथे काम करत होता. मार्केट यार्डात काम करत करत प्रज्वल सोशल मीडियावर स्वतःचे रील तयार करून पोस्ट करत होता. वेगवेगळ्या प्रकारच्या रिल्समुळे तो रिल स्टार झाला होता. प्रज्वल अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असं कुटुंब असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
प्रशासनाच्या चुकीची रिक्षावाल्याला शिक्षा, अधिकऱ्यांचा बेजबाबदारपणा, प्रणिती शिंदे भडकल्या
सॉरी पब्लिक, माफ करा… प्रज्वलची शेवटची पोस्ट –
आत्महत्येपूर्वी प्रज्वलने मेसेज लिहिलेले दोन फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. पहिल्या फोटोमध्ये ‘आज हम हे, कल हमारी यादे होगी, जब हम ना होगे तब हमारी बाते होगी.!!’ तर दुसऱ्या फोटोमध्ये, सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेतला आहे मी… माझ्या आईची, माझ्या भावाची काळजी घ्या, हीच माझी इच्छा आहे.!!” अशी पोस्ट केली आहे. त्याची पोस्ट पाहून आणि आत्महत्येची बातमी ऐकून संपूर्ण शहरात, त्याच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

