• Wed. Mar 11th, 2026
    Nanded News : पुराचं पाणी घरात शिरलं, घरातील साहित्य नेताना पाय घसरला; 16 वर्षीय मुलासोबत अनर्थ; अख्खं नांदेड हळहळलं

    Nanded News : राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अनेकांच्या शेतातील पिकांचं आणि नुकसान आणि घरात पाणी शिरलं आहे. नांदेडमधील एका 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    नांदेड मुलाचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 18 पैकी 16 दरवाजे उघडून अडीच लाख क्यूसेस इतक्या वेगाने गोदावरी नदीत पाण्याच्या विसर्ग सुरु आहे. या महापुरामुळे शहरातील अनेक भागात बॅक वॉटर शिरले असून अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचवेळी शहरातील दूल्हेशाह रहमान नगर येथे एका 16 वर्षीय मुलासोबत अनर्थ घडला आहे. घरातील साहित्य नेताना पाय घसरल्याने पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही दुर्देवी घटना घडली. शेख मिन्हाज शेख साजिद (वय 16) असं मृताचं नाव आहे. स्थानिक नागरिकांनी या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वसरणी येथील पंचवटीनगर, जुन्या नांदेडातील गाडी पुरा, काला पूल, गौतम नगर खडकपुरा, दूल्हेशहा रहमान नगर आदी भागात मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर शिरलं आहे. याच बॅकवॉटरमध्ये आज बुधवारी दुपारी शेख मिन्हाज शेख साजिद हा मुलगा पाण्यामध्ये बुडाला. तो बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं होतं. महापालिकेचे पथक तेथे पोहोचलेही; मात्र त्याला स्थानिकांनी बाहेर काढून रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होतं आहे.

    Maharashtra Timesपुण्यात संतापजनक प्रकार, विधवेला कामाचं आमिष दिलं, जबरदस्ती लग्न लावलं, दागिने चोरले, मुलांना ओलीस ठेवून तमाशात नाचवलं

    दरम्यान, या पुरामुळे गोवर्धनघाट परिसरातील स्मशानभूमी पाण्याखाली आहे. शिवाय शनिमंदिर, नाव घाट पूल देखील बुडालं आहे. अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आसना नदीला देखील पूर आला आहे. नांदेड शहरातील खडकपुरा परिसरातील सामिरा बाग येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्यात एक महिला, एक पुरुष व एक लहान मूल असे तिघेजण घरामध्ये अडकले होते. घराच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी शिरल्यामुळे त्यांना बाहेर पडणं शक्य नव्हतं. रहिवाशांनी तातडीने महापालिकेला संपर्क साधला. माहिती मिळताच महापालिकेच्या दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचून रेस्कयू केलं आणि सर्वांना सुखरूप ठिकाणी स्थलांतर केलं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा