हॉटेल जुगनू येथे 22 वर्षीय प्रियकर साहिल उर्फ सोनू राजपूत याने ऋतुजाची चाकूने निर्घृण हत्या केली. त्यानंतर सोनूने स्वतःवर चाकूने करुन घेत आत्महत्या केल्याचा आरोप आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील सजनपूर येथील जुगनू हॉटेलमध्ये 23 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान हे थरारक हत्याकांड घडलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपासणीसाठी खामगाव शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
मयत प्रेमी युगल सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील रहिवासी असून खामगाव येथे राहत असल्याची माहिती आहे. या दोघांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. या हॉटेलमध्ये ते यापूर्वी आठ वेळा आले असल्याचीही रजिस्टरवर नोंद असल्याचे कळते.
दरम्यान सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली व मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमा झाली होती. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सहाय्यक पोलीस अधीक्षक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.
घटनेच्या दिवशी संध्याकाळी अंदाजे पाच ते सहा वाजेपर्यंत ती वर्गात शेवटच्या तासिकेला गणवेशामध्ये हजर होती. खामगाव शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती डीवायएसपी प्रदीप पाटील व साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कारेवार यांनी दिली आहे.
