ST Corporation Recruitment : एसटी महामंडळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. १७ हजार ४५० जागांसाठी एसटी महामंडळात भरती होणार आहे.
एसटी महामंडळात रोजगाराची संधी
एसटी महामंडळाच्या ३००व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून आता कंत्राटी पद्धतीने एसटीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर पुढील ३ वर्ष हा करार असेल. ३ वर्षांसाठी ही एसटीतील कंत्राटी भरती असेल. एसटीकडून कंत्राटी भरतीसाठी निवड झालेल्या तरुण-तरुणींना एसटीकडून संपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतरच त्यांना सहाय्यक आणि चालक या पदांसाठी रुजू केलं जाईल.
Ladki Bahin : सरकारचा लाडक्या बहिणींना झटका, वय चोरणाऱ्या महिलांचा पत्ता कट, एकाच घरातील तीन लाभार्थींवर तर…
कधी करता येणार अर्ज?
एसटीतील कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठी येत्या २ ऑक्टोबरला निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या ई-निविदा प्रक्रियेसाठी सहा प्रादेशिक विभागनिहाय प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या कंत्राटी पद्धतीत नोकरी मिळाल्यानंतर महिन्याला कमीत कमी ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. एसटीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातील अनेक बेरोजगारांना मोठी संधी आहे. १७ हजार ४५० तरुण – तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
स्वारगेट आगारात मंत्री सरनाईकांची धडक भेट; अधिकाऱ्यांना झापलं, कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकली
एसटी महामंडळात मनुष्यबळाची गरज, मोठी भरती होणार
८ हजार नवीन बससाठी मनुष्यबाची आवश्यकता असते. अशात एसटी महामंडळात मोठी भरती होणार आहे. एसटी महामंडळात दरवर्षी जवळपास १००० च्या संख्येत इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. अशा एसटी सेवा सुरळित ठेवण्याची आवश्यकता आहे. अशात बसेसच्या देखभालीसाठी, तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी चालक, सहाय्यक अशा मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच कंत्राटी पद्धतीने रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जात आहे.

