Kondhwa Girl Social Media Post : विद्यार्थिनीने ७ मे रोजी सोशल मीडियावरील पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केले होते.
काय आहे प्रकरण?
या विद्यार्थिनीने ७ मे रोजी सोशल मीडियावरील पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केले होते. त्यानंतर तिने दोन तासांत ती पोस्ट डीलीट केली आणि जाहीर माफी मागितली. मात्र, पुण्यातील कोंढवा पोलिसांनी तिला ९ मे रोजी अटक झाली होती. तसेच शिक्षणसंस्थेने तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची कारवाई केली होती.त्यानंतर उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीकालीन खंडपीठाने पोलिसांच्या व शिक्षणसंस्थेच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘विद्यार्थिनीने पोस्ट डीलीट करून जाहीर माफी मागितली असतानाही अशी कारवाई चुकीची आहे’, असे तेव्हा उच्च न्यायालयाने नमूद करत तिच्या सुटकेचे आदेश दिले होते.
Sandeep Deshpande : कूक-पदार्थ परप्रांतीय, स्वतःच्या हॉटेलातही मराठी आचारी नाही; मनसे नेते संदीप देशपांडे ‘इंदुरी चाट’वरुन भाजपकडून ट्रोल
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थिनीने एफआयआर रद्द होण्याची याचिका केली आहे. याविषयी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. ‘न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जामीन मिळाल्यानंतर विद्यार्थिनीने परीक्षा दिली आणि उत्तम गुणही मिळवले. ती पोस्ट रिपोस्ट करताना तिचा कुहेतू नव्हता. शिवाय तिने नंतर लगेच पोस्ट डीलीट करून माफीही मागितली होती’, अशी माहिती तिच्या वकिलांनी दिली.
iPhone १७ साठी उत्सुकता, सॅफ्राॅन रंगाची तरुणाईमध्ये क्रेझ; ६-७ तासांपासून पुण्यात ग्राहकांची गर्दी
Ladki Bahin : सरकारचा लाडक्या बहिणींना झटका, वय चोरणाऱ्या महिलांचा पत्ता कट, एकाच घरातील तीन लाभार्थींवर तर…
तेव्हा, ‘ती विद्यार्थिनी केवळ हुशार आहे, हा एफआयआर रद्द होण्यासाठी आधार होऊ शकत नाही. शिवाय पोस्ट डीलीट केल्याने उलट प्रकरणाची गुंतागुंत वाढते’, असे मत मुख्य न्यायमूर्तींनी व्यक्त केले. अखेरीस या प्रकरणाची ‘केस डायरी’ सादर करा, असे प्रभारी मुख्य सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांना सांगून खंडपीठाने याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली.

