Mumbai Local Mega Block: ब्लॉककाळात रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेे
स्थानक – ठाणे ते कल्याण
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सुमारे १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Maharashtra Weather Update: नवरात्रीत मेघगर्जना! २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMDकडून अलर्ट जारी
हार्बर रेल्वेे
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान लोकल उपलब्ध राहणार आहेत.
जयंत पाटलांबद्दल नको नको ते बोलले, गोपीचंद पडळकरांना CM फडणवीसांनी फटकारलं
पश्चिम रेल्वेे
स्थानक : वसई रोड ते विरार
मार्ग : अप आणि डाउन धीमा
वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

