Hingoli Youth Dies due to Electric Shock : हिंगोलीमधील नरसी येथील एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. शेतात फ्यूज टाकण्यासाठी गेले असता ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांना तातडीने नरसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. दरम्यान याप्रकरणी अद्याप पोलिस स्थानकात औपचारिक नोंद झालेली नाही. मात्र, ग्रामीण भागात वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
क्रेडिट कार्ड अन् इतर कर्जांच्या वसुलीसाठी बनावट ओळख, पोलिसांनी धाड टाकताच भयानक वास्तव समोर; नाशिकमध्ये खळबळ
उच्चशिक्षित तरुणाचं भयंकर कृत्य
सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठा कुणबी आणि कुणबी मराठा संदर्भात शासन निर्णय काढला. हाच काढलेला शासन निर्णय रद्द होतो की काय याची चिंता असलेल्या बी फार्मसीचं शिक्षण घेतल्यानंतर आणि सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या मराठा तरुणाला लागली होती. तो आपल्या घरच्यांनाही या संदर्भात बोलत होता. आपल्याला आरक्षण मिळालं आहे आणि आता मला देखील सरकारी नोकरी लागू शकते पण हा शासन निर्णय टिकला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगलेल्या या मराठा तरुणाने काल बुधवारी विवंचनेतून आपल्या घरातच साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
Beed News : ‘OBC समाजाचं आरक्षण गेलं, दोन-तीन दिवसांपासून तणावात’; मुलाची माहिती, बीडमध्ये शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं
आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव विजय विलासराव देशमुख, वय 25 वर्ष, असं असून त्याचं बी फार्मसीचं शिक्षण पूर्ण झालं होतं. नोकरीची तयारी देखील करत होता. याविषयी विस्तृत माहिती अशी की, मृत विजय विलासराव देशमुख या तरुणाचं बी फार्मसीचं शिक्षण पूर्ण झालं होतं, तो खाजगी क्लासेस घेऊन सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

