Pune Gang War Update : पुणे गँगवॉर प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी बंडू आंदेकरने पुन्हा एकदा पोलिसांवर गंभीर आरोप केला.
कोर्टात काय-काय युक्तिवाद झाला?
सरकारी वकील : वेपन कुठून आणले, कुणी पुरवले याचा तपास करायचा आहे. आरोपींची संख्या जास्त असल्याने तपासासाठी आणखी वेळ हवा आहे. तपास अधिकारी : सुजल अमन याचे मोबाईल मित्रांकडून जप्त केले आहेत. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुषचा खून केला आहे. तसेच ते आणखी पुढे असं काही करणार आहेत का? किंवा त्याच अनुषंगाने इतर अँगल्सचा तपास करायचा आहे. 28 तारखेला आरोपी वानवडीत विशिष्ट ठिकाणी जमले होते. त्यांचे व्हॉट्सॲप चॅट आढळून आले आहेत.
तपास अधिकारी : आरोपी द्वारकेला कसे कुठून कुणामार्फत गेले याचा तपास करायचा आहे. आरोपी मोबाईल घरी ठेवून एकमेकांना भेटायचे. आरोपींनी फायरिंगची प्रॅक्टिस कुठे केली याचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी फायरिंग केल्यानंतर कपडे भीमा नदीच्या इथे फेकले. पावसामुळे ते शोधणं अवघड होत आहे
आरोपींचे वकील : आमच्याकडील सर्व माहिती दिली आहे. काहीही रिकवरी बाकी नाही. तपासात आम्ही सहकार्य करतोय. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. हे टोळीयुद्ध नाही, जाणून बुजून संपूर्ण कुटुंबाला गोवले गेले आहे. सोनाली वनराज आंदेकर यांचा सहभाग असल्याचं कुठेही तपासात निष्पन्न नाही. केवळ पुरवणी जबाबावरून त्याचं नाव ॲड केलंय. त्या त्यांच्या नवऱ्याच्या दुःखातून अजून सावरलेल्या नाहीत तरी त्यांना घरातून अटक केली.
आरोपींचे वकील : शिवम आणि सोनाली मनपा निवडणूकतील इच्छुक उमेदवार असल्याने त्यांना गोवले जात आहे. रिमांड रिपोर्टमध्ये नवीन कारणं नाहीत. तिच कारणं पुन्हा पुन्हा दाखवलं जाते, त्यामुळे MCR मिळावा. खुनाच्या 24 तासाच्या आत 120 B criminal conspiracy चा FIR दाखल केली, हा खुनाचा कट रचला गेलाय, कुणी रचलाय हे लगेचच तपास न करता कसं कळलं?
जज (रिमांड copy) : तिन्ही महिलांची पोलीस कोठडी गरजेची नाही, त्यांचा कटाशी संबंध असल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना MCR. मृत्यू झालेले वनराज किंवा आयुषचे सीरियस क्रिमिनल रेकॉर्ड नव्हते. मात्र अटक करण्यात आलेल्या इतर (पुरुष) आरोपींचे रेकॉर्ड आहेत. त्यामुळे कटाशी त्यांचा संबंध कशापद्धतीने आहे, आणि इतर पुरावे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीची गरज भासेल. सर्व पुरुष आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
बंडू आंदेकर : मी कोर्टात कृष्णाला हजर कर नाहीतर एन्काऊंटर करू ही पोलिसांनी दिलेली धमकी सांगितल्याबद्दल पोलीस मला ओरडले. मला आमच्या घरात कोण कोण नगरसेवक आहेत आणि कोण कोण निवडणुकीला उभे राहणार आहेत हे विचारलं. मी लक्ष्मी, सोनाली आणि शिवम यांची नावे सांगितली. त्यामुळे आज दुपारी माझी सून सोनालीला अटक केली.

