Buldhana News : बुलढाण्यातील जलंब येथे एका २२ वर्षीय आईने कौटुंबिक कलहातून मुलाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर सोडले आणि मालगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, मुलाला नागरिकांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक कलहातून मनस्ताप झालेल्या मातेने टोकाचे पाऊल उचलले आहे. स्वतःच्या चिमुकल्याला बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज जलंब रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथे रहिवासी असलेली कल्पना विठ्ठल घुले वय वर्ष २२ रा. जलंब असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.
Buldhana Accident : आमदाराच्या गाडीची तरुणाला जोरदार धडक, जखमी तरुण कोमात; अपघातामुळे शहरात खळबळ
कौटुंबिक वादामुळे रागाच्या भरात कल्पना या आज घरून आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघाल्या. रेल्वे रुळावरून मालगाडी येत असल्याचे पाहताच त्यांनी चिमुकल्याला कडेवरुन खाली उतरवले आणि बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मुलाला उचलून घेतले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व जलंब पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
जलंब रेल्वे स्थानकावर असते कमी वर्दळ
बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखाली असलेले हे जलंब रेल्वे स्थानक इथे मुख्यतः सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवासी गाड्या फार कमी थांबतात. मात्र मुंबई-नागपूर या मुख्य रेल्वे लाईनवर असलेल्या हे एक खामगाव करता येण्याकरता जंक्शन म्हणून ओळखले जाते. इथून थेट खामगावला येण्याकरिता रेल्वे उपलब्ध असते. असे हे रेल्वे स्थानक तिथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

