Pune – Ahilyanagar Double Decker Flyover : पुणे-अहिल्यानगर मार्गावर दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या कामाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. या मार्गाचा पुणेकरांना कसा फायदा होणार?
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील रामवाडी ते वाघोलीदरम्यानच्या (विठ्ठलवाडी) विस्तारित मार्गाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे, पण पाच मार्गावर मेट्रोच्या आखणीतच (अलाइनमेंट) दुहेरी उड्डाणपुलाची उभारणी करण्यासाठी एमएसआयडीसीने निविदा काढल्याने वाघोलीपर्यंतचे काम नक्की कोण करणार, अशी समस्या निर्माण झाली होती.
पुणेकरांचा प्रवास आता सुस्साट होणार, एक तासाचं अंतर ५ ते १० मिनिटांत कापलं जाणार; कुठे-कसे असणार मार्ग?
महामेट्रो, ‘एमएसआयडीसी’ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यानुसार रामवाडी ते वाघोली हा ११.६३ किलोमीटरचा डबलडेकरचा मार्ग महामेट्रो करणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या मार्गासाठी महामेट्रोला तीन हजार ६२६ कोटी रुपये लागणार आहेत, पण मेट्रो व महामार्ग अशा डबलडेकर मार्गांमुळे खर्च वाढणार आहे. वाढणारा खर्च एमएसआयडीसीकडून महामेट्रोला दिला जाणार आहे. वाघोलीच्या पुढील मार्ग ‘एमएसआयडीसी’ उभारणार असल्याचे निश्चित झाले आहे. सध्या मेट्रोच्या कामासाठी कर्ज स्वरूपात रक्कम घेतली आहे, पण मार्गासाठी लागणारा पैसा कसा उभारायचा, याबाबत लवकरच बैठक होणार आहे. त्यात या खर्चाची तरतूद होऊन कामाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती ‘महामेट्रो च्या वरिष्ठ अधिकान्यांनी दिली.
पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीत मिठाचा खडा; रवींद्र धंगेकर भाजपविरोधात लढणार?
असा मिळणार पैसा
वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) मार्गिकेसाठी एकूण तीन हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपयांचा प्रकल्प असणार आहे. या पूर्णतः उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. यात केंद्र व राज्य सरकारचा सहभाग प्रत्येकी ४९६ कोटी ७३ लाख रुपये (१५.४० टक्के), केंद्रीय कराच्या ५० टक्के रकमेसाठी केंद्र व राज्य सरकारचे दुय्यम कर्ज प्रत्येकी १४८ कोटी ५७ लाख रुपये (४.६० टक्के), द्विपक्षीय, बहुपक्षीय संस्थांचे कार्यसाह्य एक हजार ९३५ कोटी ८९ लाख रुपये (६० टक्के) अशा प्रकारे तीन हजार २२६ कोटी ४९ लाख रुपये प्रकल्प किंमत केंद्र सरकारच्या अनुदानासाठी पात्र असेल, राज्य सरकारचे विनव्याजी दुय्यम कर्ज २५९ कोटी ६५ लाख रुपये, भूसंपादनासाठी राज्य सरकार बिनव्याजी दुय्यम कर्ज २४ कोटी ८६ लाख रुपये, राज्य सरकार बिनव्याजी दुय्यम कर्ज ६५ कोटी ३४ लाख रुपये, पुणे महापालिकेचे जमिनीसाठी योगदान २४ लाख रुपये, बांधकाम कालावधी व्याजाकरता राज्य सरकारचे बिनव्याजी दुय्यम कर्ज १८० कोटी रुपये असणार आहे.

